शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात बेपर्वाईचा आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:11 IST

शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.

ठळक मुद्देदेगलूरनाका : दिवसाही बिनदिक्कतपणे जड वाहतुकीची ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.जुन्या नांदेडातील देगलूरनाका हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे. शहराबाहेर जाण्यासाठी आणि शहरात येण्यासाठी जुन्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामध्ये जडवाहनांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाजेगाव येथील श्याम जळबा मनवर हे वाजेगावहून एम.एच.२६ बीएफ-८०५३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन बाफना टी पॉइंटकडे जात होते. त्यावेळी देगलूर नाका परिसरातील टायरबोर्डजवळ एम.एच.२६ एच-५७४५ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्याम मनवर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी देगलूरनाका भागात रास्ता रोको केला. जवळपास एक तास चाललेल्या या रास्ता रोकोमध्ये पोलिस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र त्याकडे दूर्लक्षच होत आहे. हीच बाब संतप्त नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोमध्ये युवकांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांना आवरण्यासाठी इतवारा तसेच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नागरिकांची समजूत काढून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनात देगलूरनाका भागातील युवकांचा सहभाग होता़राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ जमीनदार यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून शहरामध्ये दाखल होणा-या जडवाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. देगलूरनाका येथील वाहतूककोंडीचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र त्या निवेदनाकडे दूर्लक्ष करण्यात आले.देगलूरनाका भागात यापूर्वीही जडवाहतुकीचे अनेक बळी गेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात ट्रकची ये-जा होते. दिवसा होणारी ये-जा रोखण्याची गरज असताना पोलिसांकडून मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्षच केले जाते. परिणामी निष्पापांचे बळी जात आहेत. हे बळी कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़दरम्यान, घटनेप्रकरणी संजय जळबा मनवर यांनी दिलेल्या तक्रारीअधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी ट्रक चालक अमृत मोटरगे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ ट्रकचालकास पोलिसांनी अटकही केली आहे.