शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कॅन्सरमुक्त नांदेडसाठी प्रशासन सरसावले; पाच लाख महिलांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:12 IST

जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ठळक मुद्देया उपक्रमांतर्गत कॅन्सर आढळून येणाऱ्या रुग्णावर डीपीसीच्या माध्यमातून जनआरोग्य अभियानाद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत कॅन्सरमुक्त नांदेडसाठी ही मोहीम जिल्हाभरात राबविणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

नांदेड : वेळीच कॅन्सरचे निदान झाल्यास योग्य ते उपचार करुन रुग्णांचे प्राण वाचविता येऊ शकतात. त्यामुळेच जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत कॅन्सर आढळून येणाऱ्या रुग्णावर डीपीसीच्या माध्यमातून जनआरोग्य अभियानाद्वारे मोफत उपचार करण्यात येणार असून कॅन्सरमुक्त नांदेडसाठी ही मोहीम जिल्हाभरात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुतांश कॅन्सरचे रुग्ण तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात आढळतात. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढते. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास योग्य त्या औषधोपचाराद्वारे कॅन्सरवर यशस्वी उपचार होवू शकतात. या अनुषंगानेच जिल्ह्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची मुखेड तालुक्यात सुरूवात करण्यात आली. मुखेड तालुक्यातील चांडोळा आणि बेटमोगरा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासणी केली असता ६७५ रुग्ण संशयित म्हणून आढळले. या संशयितांच्या तपासणीसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांचे पुन्हा स्क्रनिंग करण्यात आले. 

या तपासणीत ५२ संशयित रुग्ण आढळून आले तर १५ रुग्ण अगोदर कॅन्सर झालेले होते. यावरुन कॅन्सर आजाराची तीव्रता लक्षात येते. त्यामुळेच प्रशासनाने जिल्ह्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मोहिमेसाठी आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत कॅन्सरची लक्षणे आढळून आल्यास बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुनर्तपासणी करुन घेण्यात येणार असून तपासणीत कॅन्सरचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांवर नांदेड येथे कोणार्क रुग्णालयाच्या सहकार्याने उपचार करण्यात येणार आहे. याबरोबरच आवश्यकतेनुसार रुग्णांवर मुंबई येथेही उपचार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले़ 

रुग्णांवर मोफत उपचार करणारकॅन्सरवरील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो.  त्यामुळेच या जनआरोग्य अभियानाच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णाला गावापासून नांदेड येथील रुग्णालयापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च डीपीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. निदान झाल्यापासून उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्व पैसा शासकीय योजनांद्वारे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :cancerकर्करोगNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडmedicinesऔषधं