शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रकरणात कारवाई तर होणारच

By admin | Updated: February 3, 2015 17:11 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जानेवारी २0१४ पासून झालेल्या बदल्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल.

 नांदेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जानेवारी २0१४ पासून झालेल्या बदल्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सादर केल्याचे सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी सांगितले. या अहवालातील निष्कर्ष आणि त्यावरील कारवाईसंदर्भात शिक्षण विभागाचेच मार्गदर्शन घेतले जाईल असेही काळे यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागच एखाद्या चुकीची काय शिक्षा राहील हे सांगू शकेल. त्यामुळे या अहवालातील निष्कर्षाचे अवलोकन करून त्या सूचवाव्यात असे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना सांगितले आहे. सध्या असलेल्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस गेले तरी या प्रकरणात कारवाई मात्र होणार आहे असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांच्या स्वाक्षरीचे बोगस बदली आदेश उघडकीस आले होते. या प्रकरणात २0 शिक्षकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेत जानेवारी २0१४ पासून झालेल्या सर्वच बदल्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती./(प्रतिनिधी) शिक्षकांच्या बदलीसाठी सदस्यांचाही 'आग्रह'जि.प. शिक्षकांच्या बदल्या या पदाधिकार्‍यांच्या शिफारशींहून झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यासोबतच अनेक जि.प. सदस्यांनीही काही शिक्षकांच्या बदल्यांचा आग्रह केल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे 'आग्रह' धरणारे सदस्य कोण? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.