शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विनातिकीट ३७५ प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती़ या अंतर्गतच विभागाने अनेक गाड्यांमध्ये तपासणी केली़ त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७५ प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, प्रदीप कुमार, अंजी नायक यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला़ पहाटे चार वाजता तिकीट तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती़ यात नांदेड ते परभणी, परभणी ते जालना, परभणी ते परळी अशा विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात बसेस, जीप चा वापर करण्यात आला. अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले असून यात तब्बल ३७५ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच ४८ अनियमित प्रवासी सापडले तर १०४ जणांवर परवानगी शिवाय जास्त साहित्य घेऊन जाण्यामुळे कार्यवाही करण्यात आली. यातही तीन प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विना तिकीट प्रवाशांकडून एका दिवसातच १ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ या कारवाईत २४ सहायक सुरक्षा अधिकारी, २४ तिकीट तपासनीस, ५ कार्यालयीन कर्मचारी, ५ वाणिज्य निरीक्षक, दोन वाहतूक निरीक्षक, १२ रेल्वे पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते़ नांदेड, परभणी व जालना मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी पूर्ण झाल्या नंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी अकोला ते पूर्णा मार्गावरील गाड्यांच्या तपासणीकडे वळले़