शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘आयाराम-गयारामांना’ लोकसभेचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST

हदगाव : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये होणार असली तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार? याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

सुनील चौरे । लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये होणार असली तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार? याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. विविध पक्षांतून ‘आयाराम- गयाराम’ केलेले माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. शिवाजी माने निवडणुकीची तयारी करीत आहेत.माजी खा. सुभाष वानखेडे १५ वर्षे आमदार आणि एकदा खासदार होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खा. राजीव सातव यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. आमदार आणि खासदारकीच्या काळात वानखेडे यांनी भाजपाचे कमळ मतदारसंघात फुलू दिले नव्हते तर हिंगोली, वसमत, उमरखेड, महागावमध्येही त्यांनी आपला वरचष्मा ठेवला. दरम्यान, त्यांना पक्षातून विरोध वाढल्याने त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपामध्ये प्रवेश करुन खासदारकी लढविली मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. राजीव सातव यांनी दिल्लीशी असलेल्या संबंधाचा फायदा घेऊन काँग्रेसकडे हा मतदारसंघ सोडवून घेतला. याबदल्यात उस्मानाबाद राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील संतापून भाजपात प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार, नांदेडच्या खासदार नंतर राष्ट्रवादीत केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपद त्यांना मिळाले. दोनदा खासदारकी मिळविल्यानंतरही त्यांना पुन्हा २०१९ ची लोकसभा निवडणूक आठवून तशी ‘फिल्डिंग’ लावणे त्यांनी सुरु केली आहे. एकीकडे सुभाष वानखेडे आणि दुसरीकडे सूर्यकांता पाटील यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरु असताना यात शिवाजीराव माने यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास माने यांचा झाला. अ‍ॅड़शिवाजीराव जाधव यांचीही तयारी सुरु आहे. काँग्रेसकडून विद्यमान खा. राजीव सातव मुख्य दावेदार असले तरीही माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर त्यांना पर्याय ठरु शकतात. निवडणुकीत युती न झाल्यास शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.