शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेड जिल्ह्यात ९१ हजार दुबार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:46 IST

निवडणूक विभागाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ हजार २८८ मतदार दुबार असल्याचा संशय व्यक्त करीत आगामी निवडणुकीत या मतदारांकडून २ ठिकाणी मतदार केले जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी मतदानाची भीतीप्रदेश काँग्रेसने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

नांदेड : निवडणूक विभागाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ हजार २८८ मतदार दुबार असल्याचा संशय व्यक्त करीत आगामी निवडणुकीत या मतदारांकडून २ ठिकाणी मतदार केले जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे.निवडणूक विभागाच्या वतीने नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदारयादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार नांदेड उत्तर मतदारसंघ हा सर्वाधिक मोठा असून या मतदारसंघात ३ लाख ३ हजार १७६ मतदार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, नव्या मतदारयादीनुसार किनवट मतदारसंघात २ लाख ५७ हजार ६५१ मतदार आहेत. यात १ लाख ३२ हजार ९४५ पुरुष तर १ लाख २४ हजार ५९१ महिला मतदार असतील. हदगाव मतदारसंघात २ लाख ७३ हजार ७०० मतदार असून यात १ लाख ४३ हजार ४७० पुरुष तर १ लाख ३० हजार १०१ महिला मतदार आहेत.भोकर मतदारसंघात २ लाख ७५ हजार ४६४ मतदार असतील. यात १ लाख ४२ हजार ३२१ पुरुष तर १ लाख ३२ हजार ९४६ महिला मतदारांचा समावेश आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात २ लाख ७७ हजार ४९६ मतदार असून यात १ लाख ४३ हजार ७८० पुरुष तर १ लाख ३३ हजार ५२४ महिला मतदार आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात २ लाख ७० हजार ९२१ मतदार असून १ लाख ४० हजार ९९ पुरुष तर १ लाख ३० हजार ३५ महिला आहेत.नायगाव मतदारसंघात २ लाख ८० हजार ६४८ मतदार राहणार असून यात १ लाख ४५ हजार ४९१ पुरुष तर १ लाख ३५ हजार २४ महिला मतदार असतील. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८८ हजार ४९९ मतदार राहणार असून यात १ लाख ४८ हजार ९०७ पुरुष तर १ लाख ३९ हजार ४४० मतदार राहतील. मुखेड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७७ हजार ६९ मतदार असतील. यात १ लाख ४५ हजार ३३३ पुरुष तर १ लाख ३१ हजार २२९ महिला मतदार आहेत.दरम्यान, सोमवारी महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या म्हणण्यानुसार, किनवट विधानसभा मतदारसंघात १२ हजार २२६, हदगाव मतदारसंघात १३ हजार २१४, भोकर मतदारसंघात ९ हजार ४३६, नांदेड उत्तरमध्ये ६ हजार ८३०, नांदेड दक्षिण ४ हजार ३४६, नायगाव विधानसभा मतदारसंघात १२ हजार ५६६, देगलूर विधानसभा मतदारसंघात ९ हजार ३२३, मुखेड विधानसभा मतदारसंघात १३ हजार ४७ तर लोहा विधानसभा मतदारसंघात १० हजार ३०० अशा जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात ९१ हजार २८८ दुबार मतदारांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट आहेत. हे मतदार एकाचवेळी २ ठिकाणी मतदान करु शकतात, अशी भीती व्यक्त करीत याचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादीतील दुबार मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे. निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ही दुबार नावे वगळणे आवश्यक असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाचे लक्ष या मुद्याकडे वेधले आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक