शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ओळखी असल्याचे सांगून बेरोजगारांना ८२ लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:28 IST

छत्रपती चौक भागात आरोपींनी भारतीय वन विभाग केंद्रशासीत या नावाने कार्यालय उघडून फसवणूक

ठळक मुद्देनांदेड शहरातील घटनादहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड : शहरातील छत्रपती चौक भागात कार्यालय उघडून वन विभाग आणि जिल्हा परिषदेत नोकरी लावतो म्हणून अनेकांना ८२ लाख रुपयांना गंडविण्यात आले़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ २०१४ पासून हा प्रकार सुरु होता़ 

पूर्णा रोडवर छत्रपती चौक भागात आरोपींनी भारतीय वन विभाग केंद्रशासीत या नावाने कार्यालय उघडले होते़ आरोपी हे भारतीय वन विभागाचे राज्याचे प्रमुख अधिकारी आणि इतर कर्मचारी असल्याचे सांगत होते़ तसेच सर्वांनी केंद्र सरकारकडून नियुक्ती झाल्याचे खोटे दस्तावेज तयार केले होते़ त्यांच्याकडे येणाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते ही कागदपत्रे दाखवित होते़ दिल्लीतील वन विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्यांनी कमलाकर जायभाये (रा़ नागरवाडी ता़ लोहा) यांच्या मुलासह अन्य दहा जणांना वन विभागात फिल्ड आॅफीसर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यासाठी सर्वांकडून पैसेही उकळले़ तसेच जायभाये यांच्या नातेवाईकांच्या मुलांना अमरावती आणि यवतमाळ येथील जिल्हा परिषदेत क्लार्क या पदावर नोकरी लावतो म्हणूनही पैसे घेतले़ अशाप्रकारे २०१४ ते २०१६ या काळात आरोपींनी अनेक जणांकडून तब्बल ८२ लाख रुपये उकळले़ नोकरीची विचारपूस केल्यावर मात्र आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती़ 

या प्रकरणी जायभाये यांच्या तक्रारीवरुन शामला बालाजी मुळे (रा़ चिखली), शहाजी बालाजी मुळे, मंगला संजय जाधव, सीमा बालाजी मुळे (रा़ भावसार चौक), हेमा मुळे, राकेश सदाशिव धोंडगे (रा़ सटाणा, नाशिक), शिवाजी किशन खांडरे (रा़ हाळदा), राम अण्णाजी घाटे (रा़ पुलगाव, वर्धा), शैलेश आऱ दुबे (रा़ चांदूर रेल्वे) आणि काळे (रा़ अमरावती) अशा दहा जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

तक्रारदाराचीच जीप वापरलीआरोपींनी छत्रपती चौकात कार्यालय उघडल्यानंतर तक्रारदार कमलाकर जायभाये यांची स्कॉर्पिओ जीप भाड्याने घेतली होती़ या कारमध्येच ते फिरत होते़ तब्बल दीड वर्ष ही गाडी वापरल्यानंतर त्याचे दहा लाख रुपये भाडेही आरोपींनी दिले नाही़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडfraudधोकेबाजी