शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ५० गावे पिताहेत ‘फ्लोराईड’युक्त पाणी; ४७५४ पाण्याचे स्त्रोत पिण्यास अयोग्य

By प्रसाद आर्वीकर | Updated: February 1, 2024 23:06 IST

आठ महिन्यांत तपासले ८४२९ पाणी नमुने

नांदेड : जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अभ्यास केला असता ५० नमुने फ्लोराईड बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक फ्लोराईड बाधित नमुने किनवट तालुक्यातील आहेत. मागील आठ महिन्यांत एकूण तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ४७५४ जलस्त्रोत्रांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालावरून पुढे आले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते.

पाणी नमुन्यात आढळलेल्या जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत घट झाल्याने येणाऱ्या काळात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्हा भूजल व विकास सर्वेक्षण यंत्रणेने एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या काळात सोळा तालुक्यातून ८४२९ पाणी नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३६७५ पाण्याचे स्त्रोत पिण्यास योग्य असून, ४७५४ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यातील ५० स्रोत हे फ्लोराईडयुक्त असून, ते दीड टक्क्यापेक्षा अधिक दूषित आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील पाण्याचे नमुने दोन टप्प्यांत म्हणजे मान्सूनपूर्व व मान्सूननंतर घेण्यात येतात. स्त्रोतानुसार वेगवेगळे रंग देण्यात येतात. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतांमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, कर्ब आदींचे प्रमाण आहे. त्यात फ्लोराईड व नायट्रेटच्या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. संबंधित स्त्रोतांवर उपाययोजना केल्या जातात, अन्यथा पिण्याच्या पाण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. एकूण अयोग्य पाणी स्त्रोतांपैकी ५० स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले आहे. या स्त्रोतांमध्ये दीड टक्क्यांपेक्षा अधिक फ्लोराईड असल्याने पाणी पिल्यास आरोग्यास अधिक धोका असतो. त्यात प्रामुख्याने नळयोजना, हातपंप, विहिरी आदी स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. 

फ्लोराईडच्या पाण्याचे दुष्परिणाम

फ्लोराईडचे पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. हातपाय वाकडे होणे, दात खराब होणे व अन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही वर्षांत जिल्हा प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु, उपाययोजना तोकड्या स्वरूपात असल्याचे दिसून येत आहेत. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे ४७२१ स्रोत असल्याचे पाणी नमुने तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे.फ्लोराईडयुक्त पाण्याचा वापर करू नये. १.५ पीपीएमपेक्षा (पार्ट्स पर मिलीयन) अधिक दूषित असेल तर आरोग्यासाठी बाधक आहे. अशा ठिकाणी पिण्याचा वापर बंद करावा. हे पाणी केवळ सांडपाणी म्हणून वापरावे.

-डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण.

तालुकानिहाय आढळलेले फ्लोराईडयुक्त स्त्रोत

भूजल व सर्वेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तालुकानिहाय आढळून आलेले फ्लोराईडयुक्त स्त्रोत असे- अर्धापूर २, भोकर ८, बिलोली १ , धर्माबाद ७, किनवट १६, लोहा १, माहूर ३, मुखेड ४, नायगाव ६ तर उमरी तालुक्यात २ नमुने आहेत.