शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

उमरीतील बालिका विद्यालयासाठी शासनाकडून ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरी : येथील सिंचन कॉलनीत मागील सात- आठ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत भरणा-या कस्तुरबा गांधी विद्यालयासाठी दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील सिंचन कॉलनीत मागील सात- आठ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत भरणा-या कस्तुरबा गांधी विद्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी भव्य इमारत बांधण्यात आली़ मात्र या इमारतीस संरक्षक भिंत, विद्युतीकरण व पाण्याची सोय नसल्याने ही शाळा स्थलांतरित झाली नव्हती़ दरम्यान, ही बाब जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उर्वरित विकासकामे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून ५० लाख मंजूर करून घेतले़मानव विकास कार्यक्रमांतर्गत स्पेसिफिक योजनेतंर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बराच कालावधी होवून गेला आहे़ सदरील इमारत व मानव विकासच्या मुलींचे वसतिगृह हे गावाच्या बाहेर आहे़ मुलींच्या संरक्षणाच्या उपाययोजना तसेच विद्युतीकरण, पाणीपुरवठा व इतर आवश्यक सुविधा तेथे नसल्याने सदर इमारत रिकामी पडून होती़ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराजवळ संरक्षक कक्षाचे बांधकाम करून विद्युत व पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास ही इमारत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व निवासी वापरासाठी उपयुक्त ठरणार असल्याची बाब जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मानव विकास आयुक्तालयाचे आयुक्त यांच्याकडे ५० लाखांचा प्रस्ताव सादर केला होता़स्पेसिफिक योजनेतून विकास कामासाठी ५० लाख निधीच्या प्रस्तावास मान्यता दिल्यास प्रस्तावित कामे पूर्ण करून येणाºया शैक्षणिक वर्षापासून नवीन इमारतीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी आयुक्तांना कळविली होती़त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी सदरील प्रस्तावास मंजुरी देण्यात आली़ विद्यालयाच्या विद्युतीकरणासाठी १४ लाख १० हजार पाणी पुरवठा सुविधेसाठी ४ लाख १० हजार व संरक्षण भिंत बांधकामासाठी ३१ लाख ८० हजार रूपये मंजूर करण्यात आले़ बालिका विद्यालय व नवीन निवासी शाळेसाठी १ कोटी १० लाख व वसतिगृहासाठी ४० लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहेत़ मात्र अत्यावश्यक सुविधा नसल्याने ही इमारत गत दोन वर्षापासून रिकामीच होती़ जिल्हाधिकाºयांच्या पुढाकारामुळे आता या ठिकाणी सोयी, सुविधा पूर्ण होऊन या भागातील विद्यार्थ्यांनींना पुढील शैक्षणिक वर्षापासून लाभ मिळणार आहे़ सध्या सुरू असलेल्या सिंचन नगरातील शाळा कमी जागेत व भाड्याच्या इमारतीत भरत असल्याने विद्यार्थींनींची गैरसोय होत आहे़ सुरूवातीला या विद्यालयात शिक्षण घेणाºया मुलींची संख्या २५ होती़ मात्र आता जवळपास २० संख्या झाली आहे़