शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नांदेड जिल्ह्यात मुद्रा योजनेद्वारे ४४९ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०१७ अखेर ११ हजार ९१४ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपात महाराष्टÑ देशात तिसºया क्रमांकावर असल्याचे सांगत एकट्या नांदेड जिल्ह्यात सुमारे साडेचारशे कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.शिशू गटामध्ये एक लाख ३२ हजार ११६ प्रकरणांत ३१७ कोटी ६५ लाख रूपये, किशोर गटाच्या तीन हजार ३०४ प्रकरणांमध्ये ७९ कोटी २० लाख रूपये आणि तरूण गटात ७०९ प्रकरणांत ५२ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या एक लाख ३६ हजार १२९ एवढी असून याद्वारे ४४९ कोटी १ लाख रूपये विविध बँकांद्वारे उद्योगासाठी दिल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.कर्जवाटपामध्ये एसबीआय अ‍ॅण्ड असोसिएट बँकेने १ हजार २४५ प्रकरणे केली असून त्यांनी ३६ कोटी पाच लाख रूपये, पब्लिक सेक्टर बँकेने दोन हजार ११६ प्रकरणांद्वारे ६२ कोटी ७२ लाख तर प्रायव्हेट सेक्टर बँकेने ७४ हजार ३० प्रकरणांत १९८ कोटी एक लाख रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच रिजनल रूरल बँकेने एक हजार २७९ प्रकरणे करून २६ कोटी ९५ लाख, एनबीएफसी-मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूटने ५७ हजार ४५९ प्रकरणात १२५ कोटी २९ लाख अशी एकूण १ लाख ३६ हजार १२९ प्रकरणांत ४४९ कोटी एक लाख इतक्या रक्कमेचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, मानव विकास यंत्रणेचे नियोजन अधिकारी डी.बी. सुपेकर, उद्योजक सतीश सामंते, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनबैठकीत मुद्रा योजनेशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. गरजू आणि बेरोजगार तरूणांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शहराबरोबरच ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम तसेच आदिवासी भागात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी संबंधित यंत्रणेला केले आहे.