जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रुग्णांना बेड आणि इंजेक्शन यासाठी धावपळ करावी लागत आहे. परंतु त्यानंतरही रुग्णसंख्या वाढतच आहे. रविवारी प्रशासनाला ४ हजार ३४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात १ हजार १०५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात आरपीटीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ३७०, बिलोली ६३, हिमायतनगर ४१, उमरी २०, नाशिक १, परभणी ८, नांदेड ग्रामीण ३७, देगलूर ५३, कंधार ३९, मुदखेड २८, लातूर ६, अर्धापूर ३१, धर्माबाद ६, किनवट १७, मुखेड ३३, हिंगोली १७, भोकर २९, हदगाव ८, लोह ४३, नायगाव ३७, यवतमाळ ७ तर अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा ३०, बिलोली ६, हिमायतनगर १, माहूर ८, उमरी २५, नायगाव ११, देगलूर १४, कंधार २३, मुदखेड ९, लातूर १, अर्धापूर १५, धर्माबाद ८, किनवट २५, मुखेड ११, चंद्रपूर २, भोकर ६, हदगाव ५, लोहा १० आणि हिंगोली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात कंधार, सिध्दार्थ नगर नांदेड, कुरूला (ता. कंधार), सगरोली ता. बिलोली, विष्णुपुरी, नांदेड, भाटेगाव ता. हदगाव, एकराला ता. मुखेड, पानभोसी ता. कंधार, माधव नगर नांदेड, किल्ला रोड नांदेड, हिमायतनगर, डोंगरगाव, साई नगर किनवट, शाहू नगर गोकुदा, कारेगाव ता. लोहा, पेनूर, बारड, संभाजी नगर नांदेड, वर्ताला ता. मुखेड, किशोर नगर नांदेड, वाघत ता. भोकर, खैरगाव ता. नायगाव, संभाजी नगर नांदेड, नवरंगपुरा ता. कंधार, पांगरी ता. लोहा आणि हिंगणी ता बिलोली येथील मृतांचा समावेश आहे. रविवारी १ हजार २७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
२७ जणांचा मृत्यू तर ११०५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:15 IST