शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

२२ पॅथॉलॉजी लॅबचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:35 IST

पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरु असलेल्या पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत असून त्या बंद करण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ परंतु या आदेशाची नांदेडात अद्याप अंमलबजावणी करण्यात नव्हती़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत महापालिकेने शहरातील १०१ लॅबची तपासणी केली़ त्यात पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीत सुरु असलेल्या २२ लॅबचे परवाने निलंबित करण्यात आले़ महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचालकांचे धाबे दणाणले आहेत़

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : पॅथॉलॉजिस्टशिवाय अनेक वर्षांपासून सुरु होता कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरु असलेल्या पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत असून त्या बंद करण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ परंतु या आदेशाची नांदेडात अद्याप अंमलबजावणी करण्यात नव्हती़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत महापालिकेने शहरातील १०१ लॅबची तपासणी केली़ त्यात पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीत सुरु असलेल्या २२ लॅबचे परवाने निलंबित करण्यात आले़ महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचालकांचे धाबे दणाणले आहेत़जिल्ह्यात सर्रासपणे पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत लॅब चालविल्या जात होत्या़ अनेक ठिकाणी तंत्रज्ञच तपासणी करुन रुग्णांच्या तपासणीचा अहवाल देत होते़ तर काही ठिकाणी फक्त पॅथॉलॉजिस्टचे लेटरपॅड वापरुन तंत्रज्ञांकडून हा उद्योग सुरु होता़ त्यामुळे एकाचवेळी अनेक जिल्ह्यांत अनेक लॅबमध्ये उपस्थित राहण्याचे पॅथॉलॉजिस्ट बाबांचे चमत्कार सुरु होते़ त्यामध्ये रुग्णांची मात्र हेळसांड होत होती़ राज्यात आजघडीला जवळपास दहा हजारांवर अनधिकृत लॅब आहेत़ असा दावा महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅन्ड मायक्रोबॉयलॉजिस्ट या संघटनेच्या वतीने करण्यात आला होता़त्यावर सर्वोच्च न्यायालयाने डीएमएलटी तंत्रज्ञाला तपासण्या करता येणार नाहीत, असे आदेश १२ डिसेंबर २०१७ रोजी दिले होते़ रक्त संकलनाच्या नावाखाली या लॅबद्वारे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टीसचा प्रकार सुरु असल्याचा आरोपही संघटनेच्या वतीने करण्यात आला होता़ न्यायालयाच्या आदेशानंतर आरोग्य विभागाकडून जिल्हानिहाय पॅथॉलॉजी लॅबच्या याद्या मागविण्याचे काम सुरु आहे़ विशेष म्हणजे, मानव अधिकार आयोगानेही या प्रकरणात आता लक्ष घातले आहे़ एकट्या नांदेड शहरात तंत्रज्ञाकडून चालविल्या जाणाºया शेकडो लॅब आहेत़ काही पॅथॉलॉजिस्ट आपल्या नावाचे लेटरपॅड अशा लॅबला देतात़ तो पॅथॉलॉजिस्ट लॅबमध्ये अनुपस्थित असला तरी, त्याच्या लेटरपॅडवर सर्रासपणे तपासणीचा अहवाल दिला जात होता़महापालिकेच्या धडक मोहिमेत शहरातील १०१ लॅबची तपासणी केली असून त्यातील २२ पॅथॉलॉजी लॅबचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत़ परवाना निलंबित केलेल्या लॅबवर कोणत्याही प्रकारची तपासणी करू नये, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुमती ठाकरे यांनी केले आहे़पॅथॉलॉजिस्टची आज होणार बैठकशहरातील एम़डी़पॅथॉलॉजिस्टची आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे़ पॅथॉलॉजिस्टसोबत चर्चा करुन अनधिकृत लॅबच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे़ यापुढील टप्पा हा जिल्हाभरातील अशा लॅबवर कारवाईचा होणार आहे़१०१ लॅबची तपासणी : या २२ पॅथॉलॉजीवर झाली कारवाईशिव क्लिनिक लॅब, मालेगावरोड, एसबीआय बँकेसमोर, ओम क्लिनिक लॅब, भानुश्री हॉस्पिटल, तथागतनगर पाटीजवळ, मालेगावरोड, अनुसया क्लिनिकल लॅब, दरक हॉस्पिटल, भावसार चौक, ओम क्लिनिक लॅब, सन्मित्र कॉलनी, हुंडीवाला हॉस्पिटल, कैवल्य लॅब, चौधरी हॉस्पिटल, चैतन्यनगर, साईराज क्लिनिक लॅब, डॉ. आलमपल्लेवार हॉस्पिटल, आनंदनगर, सिटी केअर क्लिनिक लॅब, चैतन्यनगररोड, सहयोगनगर, मरहब्बा लॅब, पीरबुºहाणनगर, दुर्गा हॉस्पिटल लॅबोरटरी, वसंतनगर, माऊली क्लिनिक लॅबोरेटरी, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, नवामोंढा, श्रीनिवास कॉम्प्युटराईज्ड लॅबरॉटरी, हजारी हॉस्पिटल, हिंगोलीगेट, न्यू अ‍ॅक्टिव लॅब, देगलूरनाका, सेवा लॅब, देगलूर नाका,दिशा लॅब, देगलूरनाकाल,युनिर्व्हसल सेवा हॉस्पिटल, देगलूर नाका, नबिला लॅब, चौफाळा,मेट्रो लॅब, देगलूरनाका, फैज लॅब देगलूरनका, मॉडर्न क्लिनिकल लॅब, ज्वारी लाईन, इतवारा, देशमुख हॉस्पिटल, इतवारा, अथर्व पॅथॉलॉजी लॅब, सिडको, पाटणी पॅथॉलॉजी लॅब, सिडको. अशा एकूण २२ पॅथॉलॉजीवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत लॅबचालकांना आता आळा बसणार आहे़