शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील २०० विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:17 IST

मुगाव (ता. नायगाव) येथील माध्यमिक विद्यालयावरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेचे विद्युत दाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रार्थनेला उभ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देमुगाव येथील प्रकार : शाळेवर कोसळल्या उच्चदाब क्षमतेच्या तारा

लोकमत न्यूज नेटवर्कनरसी फाटा : मुगाव (ता. नायगाव) येथील माध्यमिक विद्यालयावरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेचे विद्युत दाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रार्थनेला उभ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांनी तातडीने शाळेला भेट दिली. याशिवाय नायगाव, देगलूर व नांदेड येथील महावितरणच्या अधिकाºयांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक शिवपुजे यांनी सांगितले, हा प्रकार काही नवीन नाही.याअगोदर तब्बल चारवेळा तारा तुटल्या होत्या. मात्र विद्युत प्रवाह चालू नसलेल्या बाजूने तुटल्याने फारशे गांभीर्याने कोणी घेतले नाही. प्रत्येक वेळी तुटलेल्या तारा जोडण्याचेच काम चालू आहे. शाळेवरच्या तारा बाजूला काढण्या -संदर्भात मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे. मात्र महावितरण कंपनी गांभीर्याने घेत नाही.मी क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थी बाजूला घेतले. थोडा तरी उशीर झाला असता तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही, असे शिवपुजे म्हणाले.४ नायगाव तालुक्यातील मुगाव येथे गुणवंत माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेवरून उच्चदाब क्षमतेची विद्युत दाहिनी गेली. मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान प्रार्थनेसाठी रोजच्या सारखे मुले प्रांगणात उभी होती. प्रार्थना सुरू व्हायच्या वेळीच शाळेवरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. आवाज होताच प्रसंगावधान राखून मुख्याध्यापक शिवसांब शिवपुजे व शिक्षकांनी प्रार्थना अर्ध्यावर थांबवून सुमारे दोनशे मुलांना तातडीने शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणले. नेमके दुसºयाच क्षणी वीज प्रवाह सुरु असलेली तार प्रांगणासह टिनपत्र्यावर कोसळली. यात विद्यार्थी बालंबाल बचावले. अन्यथा सात कर्मचाºयांसह २०० विद्यार्थ्यांना त्याची झळ बसली असती.