सावरकर अध्यक्ष तर डोणेकर उपाध्यक्षनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या मोर्चेबांधणीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश आले. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या निशा सावरकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोणेकर विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. सावरकर यांनी काँग्रेसच्या शालू हटवार यांचा तर डोणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला बोढारे यांचा ६ मतांनी पराभव केला. युतीच्या बाजूने ३२ तर आघाडीच्या उमेदवारांना २६ मते पडली.जि.प.मध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व गोंगपा अशी सत्ता होती. परंतु यावेळी पक्षादेश नसल्याने राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. जि.प.च्या ५८ सदस्यात भाजप २१, शिवसेना ८ व रिपाइं, बसपा आणि गोगपाचा प्रत्येकी एक अशा तीन सदस्यांच्या पाठिंब्यामुळे युतीचे संख्याबळ ३२ झाले. काँग्रेस १९ व राष्ट्रवादी ७ अशी २६ मते आघाडीच्या उमेदवारांना मिळाली.विधानसभा निवडणुकीमुळे जि.प.तील सत्ता कायम राखण्यासाठी युतीच्या नेत्यांनी आधीच मोर्चेबांधणी केली. गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत असलेल्या बसपाच्या पुष्पा वाघाडे, रिपाइंचे दीपक गेडाम यांना सभापतिपदाचे आश्वासन देत युतीत सहभागी केले. गोंगपाच्या दुर्गावती सरियाम यांना पुन्हा समाजकल्याण सभापतिपद देण्याची ग्वााही दिली. सदस्यांची पळवपळवी होऊ नये यासाठी युतीच्या सदस्यांना १७ सप्टेंबरलाच पर्यटनावर पाठविण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादी व छोट्या पक्षाच्या सदस्यांना सोबत ठेवून काँग्रेसलाही सत्तेची संधी होती. परंतु अंतर्गत मतभेदामुळे काँग्रेसला सत्ता हस्तगत करता आली नाही. काँग्र्रेसचा योग जुळला नाहीजि.प.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता यावी यासाठी पालकमंत्री नितीन राऊ त, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आमदार सुनील केदार,माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्र्रयत्न केले परंतु योग जुळला नाही. राजकीय समीकरणे बदलत असतात. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना सारखी मते पडली. यातून आघाडीत एकजूट असल्याचे स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीलाही असेच एकजुटीने सामोरे जाणार असल्याचा विश्वास जिल्हा काँग्रेसचे नेते नाना गावंडे यांनी व्यक्त केला. यावेळी जि.प.चे विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बंडू उमरकर, जि.प.सदस्य नाना कंभाले, पद्माकर कडू, मनोज तितरमारे आदी उपस्थित होते.
जि.प.त युती मजबूत
By admin | Updated: September 22, 2014 00:59 IST