शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.भरतीची बोगस जाहिरात

By admin | Updated: September 21, 2015 03:00 IST

भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शनच्या)नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांची फसणूक करण्याचा प्रकार घडला असतानाच...

बेरोजगारांची थट्टा : आमिषाला बळी न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन नागपूर : भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शनच्या)नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांची फसणूक करण्याचा प्रकार घडला असतानाच नागपूर जिल्हा परिषदेतील विविध १८९ पदाच्या भरतीची बोगस जाहिरात नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. नागपूर जि.प.तर्फे सन २०१५ मध्ये १८१ पदाची भरती असल्याची बोगस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात परिचर -५३, स्थापत्य अभियांत्रिकी -३१, कंत्राटी ग्रामसेवक -२९, आरोग्य सेवक -२०, कनिष्ठ सहायक १०, कनिष्ठ सहायक लेखा -८, विस्तार अधिकारी कृषी -१ आदी पदांचा यात समावेश आहे. नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावर अंकुश गुप्ता यांच्या नावावर २ सप्टेंबरला ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर २०१५ ही अर्ज करण्याची अखेरची तारीख होती. परंतु जि.प.मध्ये तूर्त पदभरती नाही. अशा प्रकारची कोणतीही जाहिरात प्रसिद्धीला दिलेली नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. खोडसाळपणा म्हणून ही जाहिरात दिली आहे. जाहिरातीत अर्जासाठी खुल्या प्रवर्गाकरिता १५० रुपये व मागासवर्गीयासाठी ७५ रुपये शुल्काचा भरणा करण्याचे सुचविले आहे. मात्र शुल्क भरण्यासाठी जि.प.चा स्टेट बँकेतील खाते क्रमांक दिला आहे. त्यामुळे खोडसाळपणे ही जाहिरात दिली आहे. बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जि.प.प्रशासनाने केले आहे. यात बेरोजगार युवकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या बोगस जाहिरातीमुळे बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जि.प.प्रशासनाने तपास करावा, अशी मागणी कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे व सचिव नरेन्द्र धनविजय यांनी केली आहे.(प्रतिनिधी)पोलिसात तक्रारजिल्हा परिषद प्रशासनाने नोकरभरती संदर्भात कोणतीही जाहिरात दिलेली नाही. खोडसाळपणा म्हणून ही जाहिरात दिली आहे. या संदर्भात पोलीस विभागाच्या सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील आरोपी स्पष्ट होईल. बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.शिवाजी जोंधळे , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.