शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळांची होणार बत्ती गुल

By admin | Updated: March 18, 2017 02:49 IST

शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना जि .प.च्या शाळांमधील वीज बिल भरण्याकरिता कोणताही निधी शाळांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे जि.प. च्या अनेक शाळांच्या वीजजोडणी खंडित करण्यात आल्या आहेत. काही शाळांवर थकीत वीज बिल असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीस महावितरणने बजावल्या आहे. त्यामुळे जि.प.च्या अनेक शाळा काळोखात जाण्याची शक्यता आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी ११ हजार रुपये एवढा निधी उपलब्ध होत असतो. त्यातील पाच हजार रुपये इमारत देखभालीवर व एक हजार रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी तर पाच हजार रुपये १३५ शालोयपयोगी साहित्याकरिता खर्च करण्याची तरतूद आहे. या निधीमधून वीज बिल भरण्याची कोणताही तरतूद नाही. शाळांना दरमहा किमान ७०० ते ८०० रुपये वीजबिल आकारणी करण्यात येते. अर्थात वर्षभराच्या वीजबिलाची रक्कम जवळपास दहा हजार रुपयाच्या घरात आहे. एवढी रक्कम कुठून भरायची हा प्रश्न नेहमीच मुख्याध्यापकांना सतावत असतो. अनेक शाळा लोकवर्गणीचे माध्यमातून कसाबसा वीज बिलाचा भरणा करीत असतात. परंतू सर्वच गावात त्याप्रमाणात लोकवर्गणी गोळा होत नाही. त्यामुळे वीजबिलाचा नियमित भरणा करणे शाळांना शक्य होत नाही. एकीकडे शंभर टक्के शाळा डीजिटल करावयाचा संकल्प शासनाच्या शिक्षण विभागाकडून बोलून दाखविल्या जात शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानातून अनुदान दिले जाते. शाळांच्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. नागपूर जिल्हा परिषदेने ३४१ शाळांच्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी १० लाख रुपये सेस फंडातून दिले होते. शाळांच्या वीज पुरवठ्याच्या संदर्भातील प्रश्न गंभीर आहे. महावितरणला आम्ही परीक्षेचे दिवस असल्याने वीज पुरवठा खंडित करू नये अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. - दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्रा.)