शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

जि.प. व नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा रोवणार

By admin | Updated: July 1, 2016 03:07 IST

नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा निर्धार : पहिली लढाई भाजप विरोधातनागपूर : नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत जुने काँग्रेसी, युवा कार्यकर्ते, महिला आदींना सोबत घेऊन गावागावात प्रत्येक बुथवर पक्षाची बांधणी केली जाईल. गटबाजी, मतभेद बाजूला सारून प्रसंगी एक पाऊल मागे येण्याची तयारी ठेवून सर्वांना विश्वासाने सोबत घेतले जाईल. आपली पहिली लढाई भाजपसोबत आहे. या लढ्यात सर्व काँग्रेसींना सहभागी करून आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवणे हे आपले पहिले लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. केंद्र, राज्यात व जिल्हा परिषदेतही भाजपची आहे. शिवाय भाजपचे केंद्र व राज्यातील हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर तगडे आव्हान असून सत्ता गाठण्याची वाट वाटते तेवढी सोपी नाही. अशा कठीण राजकीय परिस्थितीत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या आव्हानांबाबत मुळक यांच्याशी बातचीत केली असता काँग्रेसचा कार्यकर्ता एकदिलाने जागा झाला तर काहीच कठीण नाही, अशी आत्मविश्वास व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुळक म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्या की गावातील कार्यकर्ता ताकदीने नेत्याच्या पाठीमागे उभा राहतो. दिवसरात्र काम करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे त्या निवडणुकीत नेत्यांनीही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये तसा विश्वास निर्माण करायचा आहे. एकदा हा विश्वास निर्माण झाला की कुठलीही निवडणूक जिंकणे कठीण नाही. भाजपने सत्तेत येताना शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र, ती आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या सर्व घटकांपर्यंत पोहचून त्यांना भाजपकडून होत असलेली दिशाभूल पटवून दिली जाईल. भाजपच्या अव्यावहारिक व फसव्या घोषणा जनतेसमोर मांडल्या जातील. काँग्रेसचा आपले हित साधू शकते हा विश्वास पुन्हा एकदा ग्रामीण जनतेत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील समविचारी पक्षाशी चर्चा करून, प्रसंगी त्यांना एकत्र करून भाजप विरोधातील लढ्याला कसे बळ देता येईल, यासाठी रणनीती आखली जाईल, असेही मुळक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)