शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.सर्कलमध्ये फेरबदल

By admin | Updated: October 3, 2016 02:55 IST

२०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करण्यात आली आहे.

हिंगण्यात दोन जागा वाढल्या : पारशिवनी, मौदा, भिवापूर तालुक्यात प्रत्येकी एक जागा कमीकमलेश वानखेडे  नागपूर२०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करण्यात आली आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेच्या ५९ जागा होत्या. नव्या रचनेत एक जागा कमी झाली आहे. आता ५८ सदस्य असतील. नव्या रचनेत पारशिवनी, मौदा व भिवापूर या तालुक्यांमधील प्रत्येक एक जिल्हा परिषद सदस्याची जागा कमी झाली आहे. तर हिंगणा तालुक्यात दोन जागा वाढल्या आहेत. आता हिंगणा तालुक्यातून सर्वाधिक आठ जिल्हा परिषद सदस्य निवडले जातील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा या तालुक्यावर अधिक फोकस असणार आहे.२०१२ च्या निवडणुकीनुसार हिंगणा तालुक्यात जिल्हा परिषदचे डिगडोह, दाभा, रायपूर, गुमगाव, कान्होलीबारा असे सहा सर्कल आहेत. यापैकी दाभा व रायपूर हे दोन सर्कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून उर्वरित चारही सर्कलवर भाजपचा झेंडा आहे. हिंगणा नगर पंचायत झाली असल्यामुळे जिल्हा परिषदेतून वगळण्यात आले. मात्र, असे असले तरी वाढीव लोकसंख्येमुळे या तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहाऐवजी आठ सर्कल करण्यात आले आहेत. ही वाढीव सर्कल करताना मोठ्या प्रमाणात इकडची गावे तिकडे जोडण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. सर्कल रचना जाहीर झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पारशिवनी तालुक्यात कोलितमारा, पारशिवनी, साटक, टेकाडी, कन्हान हे पाच सर्कल आहेत. यापैकी कोलितमारा व टेकाडीमध्ये काँग्रेस, पारशिवनी व साटकमध्ये भाजप तर कन्हान शिवसेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोनेकर हे कन्हानमधूनच विजयी झाले होते. कन्हान नगरपरिषद स्थापन झाल्यामुळे आता या तालुक्यात एक सर्कल कमी होणार आहे. याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. मौदा तालुक्यात सद्यस्थितीत अरोली कोदामेंढी, तारसा चाचेर, खात रेवराल, मौदा बाबदेव व चिरव्हा धानोला हे पाच सर्कल आहेत. यापैकी अरोली कोदामेंढी व चिरव्हा धानोला भाजपकडे, तारसा चाचेर व मौदा बाबदेव शिवसेनेकडे तर खात रेवराल काँग्रेसकडे आहे. मौदा ही नगर पंचायत झाल्यामुळे नव्या रचनेत या तालुक्यातही एक सर्कल कमी होत आहे. याचा फटका नेमका कुणाला बसतो ते सर्कल रचना जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल. भिवापूर तालुक्यात भिवापूर, कारगाव व नांद असे तीन सर्कल आहेत. यापैकी भिवापूर भाजपकडे तर कारगाव व नांद काँग्रेसकडे आहेत. भिवापूरदेखील नगर पंचायत झाली आहे. त्यामुळे नव्या रचनेत या तालुक्यातही एक सर्कल कमी झाले आहे.