शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

झिरो माईलच्या स्तंभाला तडे

By admin | Updated: March 29, 2016 03:44 IST

देशाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर. उपराजधानीतील ‘झिरो माईल’चा स्तंभ म्हणजे देशाचे भौगोलिक मध्यवर्ती बिंदू

नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर. उपराजधानीतील ‘झिरो माईल’चा स्तंभ म्हणजे देशाचे भौगोलिक मध्यवर्ती बिंदू होय. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे तर देशाचे मानचिन्ह म्हणूनही ओळखले जाते. परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परिणामी देशाचे हे मानचिन्ह संकटात सापडले आहे.नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. याची जाण ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले. देशाचे ते भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे आपले झिरो माईल होय. या ठिकाणी एक सुंदर असा स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक व रिझर्व्ह बँक चौक यादरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शविला नाही. परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे. पर्यटकांना चिंता ४झिरो माईल हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. ते पाहण्यासाठी दररोज अनेक लोक येतात. सोमवारी विद्याधर सहस्रबुद्धे नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह झिरो माईल पाहायला आली होती. त्यांची नात अमेरिकेला राहते. ते सहकुटुंब नागपूरला आले होते. तेव्हा त्यांनी झिरो माईल पाहायची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे ते सर्वांना घेऊन आले होते. सहस्रबुद्धे हे सारथी सारख्या संस्थेशी जुळलेले आहे. त्यांना झिरो माईलची अवस्था पाहून अतिशय दु:ख झाले. त्यांना या स्तंभाविषयी विशेष आकर्षण आहे. शून्य मैलाचा दगड म्हणजे नागपूरची ओळख आहे. म्हणून याकडे प्रशासनने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हेरिटेज कमिटीलाही जाणीव ४झिरो माईलच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाल्याबाबत हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटणकर यांना विचारणा केली तेव्हा आपल्याला याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. झिरो माईलच्या सौंदर्यीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आपण सध्या नागपूर बाहेर असल्याने त्याबाबत सविस्तरपणे सांगून शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.