शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

नवक्रांतीसाठी युवकांनी राजकारणात उतरावे

By admin | Updated: August 23, 2015 03:03 IST

सध्या देशाचे राजकारण कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात नवक्रांती निर्माण करण्यासाठी युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे, ...

आंबेडकरी युवा संमेलन : वक्त्यांचा सूर नागपूर : सध्या देशाचे राजकारण कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात नवक्रांती निर्माण करण्यासाठी युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे, असा सूर आंबेडकरी युवा संमेलनात उपस्थित वक्त्यांनी काढला. पाचवे आंबेडकरी युवा संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठातील विधी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेश माने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी उपस्थित होते. किशोर गजभिये आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. दलित व आदिवासी युवकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. आरक्षण नाकारण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे युवकांनी उद्योग निर्मितीकडे आपले लक्ष केंद्रित करावे. अपमानास्पद असलेल्या वनवासी शब्दांवर बंदी आणून मूळनिवासी शब्दच व्यवहारात प्रचलित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. नवशक्ती निर्माण करण्यासाठी बहुजनांनी एकीची मोट बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश माने यांनी आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढत अन्यायाचा विरोधात पेटून उठवण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. प्रदीप आगलावे, श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी यांनीही मार्गदर्शन केले. शीतल गडलिंग यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)