शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात तरुणांनी वाचविले पुरात अडकलेल्या वृद्धेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:27 IST

नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले.

ठळक मुद्देनदीचे पाणी अचानक वाढल्याने पंचाईत

अरुण महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले.सुमित्रा असोले, रा. पोटा, ता. सावनेर या नेहमीप्रमाणे गावालगत वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोबत त्यांनी १२ वर्षीय नातीलादेखील नेले होते. नात तिच्याजवळ खेळत होती. त्या पात्रात मध्यभागी असलेल्या खड्ड्याकाठी बसून कपडे धूत होत्या. त्यावेळी नदीचे पात्र कोरडे होते.पाऊस न बरसता काही वेळातच पात्रात पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी नातीला काठावर जाण्याची सूचना केली. सर्व साहित्य घेऊन त्या पात्राबाहेर पडत असताना पाण्याची पातळी वाढली. त्यांना पुरातून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने त्या मध्येच थांबल्या. त्याचवेळी अंकित यादव, विनोद भारद्वाज, चेतन भोंडेकर, प्रफुल मांगुळकर, चेतन नगराळे आदी तरुण या परिसरात फिरायला आले होते; शिवाय सुजित सूर्यवंशी व आकाश साहानी हे दोघेही सदर दृश्य बघत होते.त्यातच अंकित यादव आणि विनोद भारद्वाज या दोघांनी लगेच पाण्यात उडी मारली आणि वृद्धेपर्यंत पोहोचले. त्या दोघांनीही तिला हात पकडून सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच नदी दुथडी भरून वाहायला लागली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तिला व तिच्या नातीला पोटा येथे घरी पोहोचवूनही दिले. नदीकाठी असलेले इतर तरुण मात्र नुसतेच बघत होते. परंतु, या दोघांव्यतिरिक्त कुणीही तिच्या मदतीला धावले नाही. या हिमती कार्यामुळे दोघांचेही कौतुक होत आहे. कन्हान नदीचा उगम मध्य प्रदेशात असून, उगमाकडे जोरदार पाऊस बरसल्याने नदीला पूर आला होता.

टॅग्स :Womenमहिला