लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता.आरोपी संतोष ऊर्फ हड्डी गोंड याच्यासोबत डब्बाचा दारूभट्टीवर १० दिवसांपूर्वी वाद झाला होता. ते वैमनस्य धरून आरोपी हड्डी तसेच अर्जुन शिवकुमार अजित, राकेश ऊर्फ लडी आणि अशफाक खान (सर्व रा. राजूनगर) यांनी रविवारी रात्री ८ च्या सुमारास डब्बाला दारूच्या भट्टीजवळ पकडले. त्याला लाथाबुक्कयांनी डोक्यावर, छातीवर, पोटावर जोरदार मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला चौघांनी पकडून जोरात खाली आपटले. त्यामुळे डब्बा ठार झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. दारूभट्टीवर पळापळ झाली. माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह मेडिकलला पाठविला. त्यानंतर लक्ष्मणराव सुखारी प्रसाद (वय २३) यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नागपुरातील एमआयडीसीत तरुणाची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:25 IST
जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता.
नागपुरातील एमआयडीसीत तरुणाची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या
ठळक मुद्देचार आरोपी ; जुने वैमनस्य कारण