शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’ देणार विकासाचा मार्ग

By admin | Updated: January 26, 2015 00:54 IST

विदर्भातील युवा पिढीला योग्य प्रकारची नोकरी अथवा स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ

विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचा पुढाकारनागपूर : विदर्भातील युवा पिढीला योग्य प्रकारची नोकरी अथवा स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याया संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनने घेतला आहे. या संकल्पांतर्गत नागपुरात ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मिहान- नॅशनल रुलर लाईव्हलीहूड मिशन, नेहरू युवा केंद्र, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिश यांच्या विशेष सहकार्याने मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम परिसर कोराडी रोड येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या समिटची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. तीन दिवस चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात उद्बोधक विचारांचे चित्रप्रदर्शन, उद्योगधंद्यात स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या मान्यवरांची उद्बोधक भाषणे, मुलाखती, परिसंवाद, स्लाईड शो, विविध उद्योगांचे प्रशिक्षण, उद्यमशीलतेला पोषक ठरतील, असे मार्गदर्शन करणारे सरकारी व स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल असे आकर्षक स्वरूप असणार आहे. जवळपास १५० स्टॉल उभारण्यात येणार असून यात विविध शासकीय योजनांची माहितीसुद्धा राहणार आहे. यासोबतच एक हजारांहून अधिक स्वयंरोजगार व्यवसायांची तपशीलवार माहिती मिळेल. महिलांना घरच्या घरी सहज करता येईल, असे शेकडो कुटीरउद्योग कोणते, याबाबत माहिती, बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी शेकडो कुटीरउद्योगांची माहिती, व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, विविध प्रकारची मशीनरी व कच्चा माल कुठे मिळेल, उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या संस्था कशा प्रकारे अर्थसाहाय्य करतात. देशभरात नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे र्रिक्रुटमेंट बोर्ड, बँक, पोलीस भरती, भूमी अखिलेख भरती आदी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबतचे नामवंत तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सुद्धा या समिटमध्ये होणार आहे. (प्रतिनिधी)उद्यमशील स्वप्नांच्या पंखांना मिळणार बळ विदर्भातील तरुणांसाठी विशेषत: प्रत्येक घटकांतील हातांना योग्य काम देऊन त्यांना सकारात्मक दिशा देण्याच्या दृष्टीने ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंरोजगार व नोकऱ्यांच्या संबंधात कार्यरत असलेल्या शंभराहून अधिक सरकारी व स्वयंसेवी संस्थांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या विचारमंथनातून निर्माण होणारे नवनीत हे तरुणाईला आत्मविश्वास व विकासाच्या उन्नतीचे बोधामृत ठरणार आहे. या समिटच्या माध्यमातून विदर्भातील तरुणांच्या उद्यमशील स्वप्नांच्या पंखांना बळ देणारी एक अभिनव लोक चळवळ सुरू असून नागरिकांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आ. प्रा. अनिल सोलेअध्यक्ष - विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशन