शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: August 10, 2016 02:31 IST

मित्रांसह पोहायला गेलेल्या एका तरुणाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. रोशन किशोर दायमा (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दारूने केला घात : मित्रादेखत बुडाला नागपूर : मित्रांसह पोहायला गेलेल्या एका तरुणाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. रोशन किशोर दायमा (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सीताबर्डीत एका रेडिमेड स्टोअर्समध्ये सेल्समन म्हणून काम करीत होता. हॉकर्सकडून व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी सीताबर्डी बाजारपेठ बंद होती. त्यामुळे बाजारपेठेतील विविध दुकानात काम करणारे अनेक तरुण इकडे तिकडे फिरायला गेले. रोशन आणि त्याचे मित्र गंगाधर यादव, प्रतीक निकोडे, निखील अशोक राव आणि रितेश लुधियानी हे सर्व अंबाझरी तलावावर गेले. तेथे अनेक तरुण-तरुणींचे घोळके होते. रोशनच्या मित्रांसह अनेकजण तलावात पोहत होते. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास दारू पिल्यानंतर रोशन याने तलावात उडी घेतली. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या रोशनने मित्रालाच घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मित्राने स्वत:ला वाचविण्यासाठी रोशनला झटकले. रोशनला वाचवावे म्हणून अन्य मित्र मदतीसाठी आरडाओरड करू लागले. परंतु फायदा झाला नाही. मित्रांच्या डोळ्यादेखतच रोशन पाण्यात बुडाला. हादरलेल्या मित्रांनी अंबाझरी ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मात्र अंधारामुळे पोलिसांना रोशनला शोधण्यात यश आले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा तलावात शोधकार्य सुरू झाले. त्यासाठी अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. दुपारी २.३० च्या सुमारास सराईत पोहणाऱ्यांनी रोशनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. (प्रतिनिधी) कुटुंबीयांवर आघात रोशन सर्वसामान्य परिवारातील आहे. तो गांधीबागमध्ये राहत होता. त्याला वडील नाहीत. आई, दोन बहिणी आणि पत्नी तसेच एक नयन नामक मुलगी आहे. तो घरातील प्रमुख होता. तो तलावात बुडाल्याचे कळल्यानंतर त्याची आई आणि पत्नी यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. त्याचा मृतदेह तलावातून काढण्याचे काम सुरू असताना परिवारातील सदस्य, नातेवाईक अन् शेजारी तलावाच्या काठावर आक्रोश करीत होते. घरातील कर्ता गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या सोबतच्या मित्रांची अवस्थाही खराब झाली आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.