शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ब्लँकेट दूत -उपराजधानीत रात्रभर जागून फेडताहेत समाजऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:05 IST

गेल्या सहा वर्षांपासून डॉ आशिष अटलोए व त्यांचे सहकारी शहरात निशुल्क ब्लँकेट वितरण करीत आहेत.

ठळक मुद्देनिराधारांना देत आहेत मायेचे पांघरूण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, डिव्हाडरवर, मंदिराच्या आश्रयाने, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर आदी अनेक सार्वजनिक ठिकाणी गरीब, निराधार, वंचित मंडळी थंडीमुळे कुडकुडत झोपलेली असतात.. अशा निराधारांसाठी कित्येक जण विचार करतात परंतु कृती मात्र करणारे दुर्मिळच असतात. अशात थेट कृती करून एका युवकाने ब्लँकेटदूत म्हणून नागपूरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आशिष अटलोए असे त्या होतकरू तरुणाचे नाव आहे. गेल्या सहा वर्षांपासून डॉ आशिष अटलोए व त्यांचे सहकारी कैलास कुथे, निलेश नागोलकर, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, चंद्रकांत चोथे सुशील मौर्य, जयराज मार्कंड, गुंजन रठ्ठे शहरात निशुल्क ब्लँकेट वितरण करीत आहेत.अशी करतात मदत...डॉ. आशिष अटलोए आणि त्यांचे सहकारी मागील सहा वर्षांपासून रस्त्यावर कोणी थंडीत कुडकुडत दिसल्यास त्याबाबत कळविण्याचे आव्हान व्हॉटस्पच्या माध्यमातून करीत आहेत. दररोज त्यांना थंडीत कुणीतरी झोपून असल्याचे 17 -18 मेसेज येतात निरोप मिळताच ही मंडळी तेथे जाऊन गरजूला ब्लँकेट देतात. रस्त्यावर झोपलेली व्यक्ती बहूधा उपाशी पण असते त्यामुळे आपल्या सोबत ब्रेड, बिस्कीट पण ठेवतात रात्री 11 ते 1 पर्यंत ब्लँकेट वितरित करतात.ज्यांना कोणाला या उपक्रमांमध्ये मदत करायची असेल किंवा ब्लँकेट द्यायचे असेल त्यांनी डॉ.आशिष अटलोए 9922765678 या क्रमांकावर संपर्क साधावा.अशीही सामाजिक बांधिलकी....केवळ हिवाळ्यात ब्लँकेट वितरणाचे कामच नाही तर उन्हाळ्यात गरीब, निराधार, अनवाणी पायांसाठी ते चप्पल दूत होतात, याशिवाय पावसाळ्यात छत्र्या ,गरीबांच्या घरांसाठी ताडपत्री , पक्षांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेले आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवत आहेत.

भिकाऱ्यांना रोजगारासाठी राबविणार उपक्रम....रोजगार मिळवून स्वाभिमानाने जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या निराधार भिकाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार डॉ.आशिष अटलोए यांनी केला आहे. छत्र हरवलेले निराधार, वंचित, गरीब रोजगाराची इच्छा बाळगणाऱ्या भिकाऱ्यांना वजन काटा देणे, मंदिरासमोर फुले तेल किंवा आवश्यक साहित्यांची दुकाने लावून देण्यास मदत करणार असल्याचे सांगितले

टॅग्स :Socialसामाजिक