शासनाचा निषेध : भूमी अधिग्रहण कायद्याला विरोधकामठी : केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावणाऱ्या भाजप शासनाचा युवक काँग्रेसने निषेध व्यक्त केला. मोदी सरकारच्या शेतकरी विरोधातील भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध दर्शवित युवक काँग्रेसतर्फे तालुक्यातील गादा येथून किसान संदेश पदयात्रा काढण्यात आली.किसान संदेश पदयात्रेची सुरुवात माजी ऊर्जामंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार राजेंद्र मुळक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हिमंत सिंग, हरी किसन, रामटेक लोकसभा युवक काँग्रेसचे प्रभारी अमर खानापुरे, कामठी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलु अन्सारी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अनिल रॉय, प्रदेश सचिव नीरज लोणारे, इरसाद शेख, जि. प. सदस्य सरिता रंगारी, नाना कंभाले, कुंदा आमधरे, भगवंतराव रडके, शकुर नागानी, कमलाकर मोहोड, अनुराग भोयर, उमेश रडके, डुमदेव नाटकर, मनोहर कोरडे, तेजराम गोरले, सरपंच ज्योती झोड, माला इंगोले, मनीष कारेमोरे, मतीन खान, अफाज ठेकेदार, मनोज यादव, संदीप यादव, कृष्णा यादव, शंकर वाडीभस्मे, राजकिरण बर्वे, राजकुमार भगत, तुरुंग खोब्रागडे, शेषराव दंवडे आदी उपस्थित होते. किसान संदेश पदयात्रा उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. राजेंद्र मुळक, सुरेश भोयर म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. किसान संदेश पदयात्रेला गादा गावापासून सुरुवात झाली. आजनी, कामठी जयस्तंभ, कळमनामार्गे, येरखेडा आदी विविध मार्गाने भ्रमण करून काँग्रेस कमिटी कार्यालयात समारोप झाला. पदयात्रेला मोठ्या संख्येत कार्यकर्ते सहभागी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ युवक काँगे्रसची पदयात्रा
By admin | Updated: July 5, 2015 03:00 IST