आॅनलाईन लोकमतनागपूर : भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसभा युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी संघ(नागपूर)ते मोदी(वाराणसी)जनचेतना यात्रा काढण्यात आली. नागपुरातून निघालेली ही बाईक यात्रा वाराणसी येथे पोहचून मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार आहे.रेशीमबाग चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी सूरज हेगडे, महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी आदींनी या बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माजी खासदार गेव्ह आवारी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, यवतमाळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल ठाकरे, चंद्रपूरचे अध्यक्ष शिवा राव, संगीता तलमले, महाराष्ट्र प्रदेश महासचिव स्वप्निल पाटील, अमरावतीचे अध्यक्ष सागर देशमुख, नीलेश विश्वकर्मा, यशवंत कुंभलकर, मुजीब पठाण, विजय बाभरे, नितीन कुंभलकर, काँग्रेस सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, प्रज्ञा बडवाईक, नगरसेविका हर्षला साबळे, मनोज गावंडे, नितीन साठवणे, किशोर जिचकार, नरेंद्र जिचकार, रामटेकचे अध्यक्ष अनिल राय, उमेश शाहू, अक्षय घाटोळे, किशोर गायधने, रमेश पुंड आदी उपस्थित होते.या वेळी शेळके म्हणाले, साडेतीन वर्षात केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसाय बंद पडले. शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. महागाई वाढतच आहे. हे सर्व मुद्दे प्रवासादरम्यान लागणाºया गाव व शहरांमध्ये सभा घेऊन नागरिकांसमोर मांडली जातील.नागपूर ग्रामीणमध्ये स्वागत व सभारॅली नागपुरातून निघाल्यानंतर कामठी, कन्हान, कांद्री व मनसर येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्त्वात रॅलीचे स्वागत करण्यात आले. या चारही ठिकाणी सभा घेण्यात आल्या. या वेळी काँग्रेसचा जयघोष करीत भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर रात्री रॅली पुढच्या ठिकाणासाठी रवाना झाली.
युवक काँग्रेसची जनचेतना यात्रा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:55 IST
भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसभा युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी संघ(नागपूर)ते मोदी(वाराणसी)जनचेतना यात्रा काढण्यात आली.
युवक काँग्रेसची जनचेतना यात्रा रवाना
ठळक मुद्देनागपूर ते वाराणसी बाईकने प्रवासमोदी सरकारचे अपयश मांडणार