शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

युवक कॉंग्रेसचे सरसंघचालकांविरोधात आंदोलन, देवडिया भवनाजवळ राडा

By योगेश पांडे | Updated: January 19, 2025 21:08 IST

विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी इंदूर येथे केलेल्या एका वक्तव्याचा विरोध करत युवक कॉंग्रेसकडून देवडिया भवनासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते संघ मुख्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असतानाच विनापरवानगी आंदोलन केल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस-कार्यकर्त्यांची झटापट झाली व काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.

राम मंदिर बनल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य सरसंघचालकांनी काही दिवसांअगोदर केले होते. त्यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी टीकादेखील केली होती. नेमके रविवारी नागपुरात युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा हे नागपुरात होते. देवडिया भवनात झालेल्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतदेखील उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व आंदोलन करत संघाच्या गणवेशातील खाकी पॅंट जाळली. तसेच संघावर बंदी आणावी अशा मागणीचे फलक दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विनापरवानगी आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने थोडा वेळ पोलीस व कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरच रोखून धरले होते. अखेर आंदोलक ऐकत नसल्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे देवडिया भवन ते चिटणीस पार्क चौकात तणाव निर्माण झाला होता. तसेच वाहतूकीची कोंडीदेखील झाली होती. सायंकाळनंतरदेखील चिटणीस पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ