वाडी : नजीकच्या लाव्हा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. २३) व गुरुवारी (दि. २४) आपले गाव, आमचा विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात येरला, माहुरझरी, बोरगाव, खंडाळा व लाव्हा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले हाेते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे १५ व्या वित्त आयाेगांतर्गत मिळणाऱ्या निधीचा याेग्य विनियाेग करणे, त्या निधीच्या वितरणाची पद्धत, लाेकसंख्येचा निकष, खर्चाची पद्धत, मागासवर्गीय साेसायटीवर खर्च करणे बंधनकारक असणे, दरवर्षीचे वित्त नियाेजन, याेजनांची आखणी यासह अन्य बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ममता धोपटे, पंचायत समिती सदस्य प्रीती अखंड, पंचायत समितीच्या महिला बालकल्याण अधिकारी उज्ज्वला ढोक, माजी उपसभापती सुजित नितनवरे, सरपंच ज्योत्स्ना नितनवरे उपस्थित होत्या. संचालन ग्रामविकास अधिकारी विकास लाडे यांनी केले तर, उपसरपंच महेश चोखांद्रे यांनी आभार मानले.