शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’ पुन्हा थांबली

By admin | Updated: March 30, 2017 02:33 IST

महापालिकेने शहर बससेवेची सूत्रे हाती घेण्याला महिनाही झालेला नाही तोच स्टार बसच्या चालक-वाहकांची बुधवारी अचानक संप पुकारल्याने...

वेतनाच्या प्रश्नावरून चालक-वाहक संपावर : विद्यार्थी व प्रवाशांचे हाल नागपूर : महापालिकेने शहर बससेवेची सूत्रे हाती घेण्याला महिनाही झालेला नाही तोच स्टार बसच्या चालक-वाहकांची बुधवारी अचानक संप पुकारल्याने ‘आपली बस’ ची चाके थांबली. शहर बसची वाहतूक ठप्प पडल्याने दररोज बसचा प्रवास करणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले. दुसरीकडे संपाचा फायदा घेत आॅटो, ई-रिक्षा व व्हॅन चालकांनी मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांना वेठीस धरले होते. बुधवारी सायंकाळपर्यत संपावर तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे रात्री उशिरापर्यत कर्मचारी कामावर परतले नव्हते. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या निर्देशानुसार पर्याय म्हणून तीन रेडबस आॅपरेटर बेरोजगार प्रशिक्षित युवकांना नोकरीवर ठेवू शकतात. तसेच आंदोलनातील सहभागी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. १ मार्चपासून महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ‘आपली बस सेवा’ सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी २१० बसेस रस्त्यावर धावणार होत्या. सकाळी ७ वाजता पटवर्धन मैदानावरून ५२ बसेस, खापरी डेपोतून १८ बसेस नेहमीप्रमाणे निघाल्या होत्या. परंतु हिंगणा डेपोतील वाहक पोहचले नव्हते. त्यामुळे येथून एकच बस बाहेर पडली. अर्ध्या तासात शहरात वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती पसरली. यासोबतच शहरातील सर्व बस वाहतूक ठप्प पडली. वंश निमय यांच्याकडून शहर बस सेवा महापालिकेच्या परिवहन विभागाकडे १ मार्चला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या बससेवेचे ‘आपली बस’ असे नामकरण करण्यात आले आहे. जुन्या ११२६ चालक-वाहकापैकी ८०० जणांना तीन आॅपरेटरने कामावर घेतले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची वर्तणूक, चौकशी सुरू असल्याने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी) प्रशिक्षित बेरोजगारांना ठेवणार चालक-वाहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा चर्चा करण्यात आली आहे. मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अद्याप महिना झालेला नाही. अशा परिस्थितीत वेतनाला विलंब, कमी वेतन मिळत असल्याच्या मुद्यावरून आंदोलन करणे योग्य नाही. बुधवारी यावर तोडगा निघाला नाही तर प्रशिक्षित बेरोगार युवकांना कामावर ठेवण्याचे निर्देश नवीन आॅपरेटला देण्यात येतील. - श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका