शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

आपली बस महामेट्रोच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST

महामंडळ ते महामेट्रोकडे वाटचाल : मनपाचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली ...

महामंडळ ते महामेट्रोकडे वाटचाल : मनपाचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी, यासाठी परिवहन महामंडळाकडून मनपाने ही जबाबदारी स्वीकारली होती. आता ती महामेट्रोला देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.

राज्य परिवहन महामंडळाला वर्ष २००१ ते २००५ या कालावधीत नागपूर शहरातील बस संचालनात २०.६८ कोटीचा तोटा झाला होता. ही नुकसानभरपाई महापालिकेने द्यावी, अशी मागणी महामंडळाने मनपाकडे केली होती. परंतु मनपाने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. ३ मार्च २००७ रोजी महामंडळाने शहर बससेवा संचालित करण्याची अनुमती मनपाला दिली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी १९९४ पासून प्रयत्न सुरू झाले. अखेर ९ फेब्रुवारी २००७ रोजी महापालिका व वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) यांच्यात दहा वर्षांचा करार झाला. करारानुसार २३० बस ऑपरेटरला सुरू करावयाची होती. यात १५० मोठ्या व ८० लहान बसचा समावेश होता.

यातील २०० बस सहा महिन्यात खरेदी करावयाच्या होत्या. बस खरेदी, कर्ज व बस नोंदणी, व्यवस्थापन सर्व व्यवस्था ऑपरेटरला करावयाची होती. करारानुसार व्हीएनआयएलला पाच वर्षांसाठी प्रतिबस दरमहा ३ हजार ७५० रुपये व त्यानंतर प्रतिमाह ४ हजार मनपाला द्यावयाचे होते.

....

जेएनएनयूआरएमच्या ३०० बस भंगारात

व्हीएनआयएल यांच्याशी झालेल्या करारानुसार २४० बस शहरात धावल्याच नाही. १६० ते १८० सुरू केल्या. जेएनएनयूआरएमच्या ३०० बस मनपाला मिळाल्या. अशाप्रकारे शहरात ५३० बस मिळाल्या. परंतु शहरात धावणाऱ्या बसची संख्या २४० च्या पुढे गेली नाही. पुढे ३०० बस भंगारात गेल्या. गाड्यांचे पार्ट चोरीला गेले. मोठा घोटाळा झाला.

....

नोटीसचा परिणाम नाही

करारानुसार शहरात बस धावत नसल्याने व प्रवाशांना सुविधा उपलब्ध न झाल्याने मनपा प्रशासनाने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला शंभरहून अधिक नोटिसा बजावल्या. परंतु राजकीय पाठबळ असल्याने मनपाला ठोस निर्णय घेता आला नाही. २०१२ मध्ये शहर बससेवेची जबाबदारी अर्बन मॉस ट्रान्झिट कंपनी (यूएमटीसी)ला दिली. परंतु परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.

....

कोट्यवधी बुडाले

केंद्र सरकारकडून मिळालेल्या २४० मधील १३० बस काही महिने सुरू होत्या. काही वर्षातच सर्व बस भंगारात निघाल्या. ऑपरेटरने मनपाकडे प्रवासीकराची १० कोटीची रक्कम जमा केली नाही. तिकिटाची रक्कमही मनपाकडे जमा केली नाही. ही रक्कम २५ ते ३० कोटीच्या आसपास असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

....

तीन ऑपरेटरची नियुक्ती

शहरातील बसव्यवस्था सुधारावी यासाठी वंश निमय यांचा करार संपुष्टात आणल्यानंतर २०१६ मध्ये मनपाने तीन ऑपरेटरची नियुक्ती केली. शहरात ३३६ बस धावायला लागल्या. परंतु मनपाला दर महिन्याला ८ ते १० कोटी तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला १०० ते ११० कोटीचा बोजा सहन करावा लागत आहे. महापालिकेने ४३२ रेड बसेस व ५५ ग्रीन बसेस या सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ग्रीन बस बंद पंडल्या. रेड बसही पूर्ण धावत नाही. आता महामेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.