शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आपली बस महामेट्रोच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटींच्या तोट्यात आहे. याचा विचार करता ...

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटींच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शहरातील परिवहन सेवा एकाच प्राधिकरणाकडे असावी. तसेच यातून बचत होणाऱ्या १०० कोटींतून शहरातील विकासकामे करता येईल, अशी माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिवहन सेवा महामेट्रोच्या माध्यमातून चालविण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. मात्र अद्याप महामेट्रो यांच्याकडून बस चालविण्याचा प्रस्ताव आलेला नाही. मनपाने स्वत: हा प्रस्ताव तयार आणला आहे.

नियम व अटीच्या आधीन राहून बससेवा महामेट्रोला देण्याच्या प्रस्तावाला समितीत मंजुरी देण्यात आली.

मनपाचा बससेवेवर वर्षाला १६४.८३ कोटींचा खर्च, तर उत्पन्न ६४.४६ कोटी आहे. म्हणजेच १०० कोटींचा तोटा आहे. त्यात केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ४० इलेक्ट्रिक बसमुळे मनपावर पुन्हा २० कोटींचा बोजा वाढणार आहे. ४२६ रेडबसचे संचालन मनपा करीत आहे. तीन रेड बस ऑपरेटर व एक इलेक्ट्रिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून बसचे संचालन होत आहे. महामेट्रोने मनपाला बुटीबोटी ते सीताबर्डी व हिंगणा ते सीताबर्डी दरम्यानची बससेवा बंद करण्याचा सल्ला दिला होता. वास्तविक मनपा फिडर बससेवा उपलब्ध करण्याला तयार आहे.

या मार्गावरील बससेवा बंद केल्यास आपल्या बसला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळाली तरच बससेवा हस्तांतरित करणे शक्य होईल.

सत्तापक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामेट्रो स्वत:ला सक्षम करण्यात अपयशी ठरली आहे. मेट्रो सेवेचे खासगीकरण केले जात आहे. अशा परिस्थितीत आपली बस महामेट्रोला हस्तांतरित केल्यास नागरिकांना मिळत असलेली बससेवाही मिळणार नाही. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये बस ऑपरेटची नियुक्ती करताना दहा वर्षांसाठी बससेवा संचालित करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. आयबीटीएम ऑपरेटर डिप्टसची तीन वर्षांसांठी नियुक्ती करण्यात आली. अशा परिस्थितीत सेवा हस्तांतरित करावयाची झाल्यास यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.