शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘यंगस्टर्स’ पछाडले पाठदुखीने; खुर्चीत अयोग्य पद्धतीने बसणे ठरू शकते धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 19:05 IST

Nagpur News व्यायामाचा अभाव आणि सतत बैठे काम करण्यामुळे पाठीचे दुखणे सर्वसामान्य झाले असून शहरातील दहामधील साधारण दोन तरुण (यंगस्टर्स ) या आजाराने पछाडलेले आहेत.

ठळक मुद्देदहापैकी दोघांना त्रास

नागपूर : तासन तास बसून संगणक, लॅपटॉपवर काम करणे, नेटसर्फिंग करणे, जंक फूड व कोल्ड ड्रिंकचे अधिक सेवन करणे ही आजच्या तरुणांची बदललेली ‘लाइफस्टाइल’. यातच व्यायामाचा अभाव आणि सतत बैठे काम करण्यामुळे जीवघेण्या आजारांना फार लवकर बळी पडत आहे. यात पाठीचे दुखणे सर्वसामान्य झाले असून शहरातील दहामधील साधारण दोन तरुण (यंगस्टर्स ) या आजाराने पछाडलेले आहेत.

पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही. तरुण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. खुर्चीत अयोग्य रीतीने बसणे, मधून मधून ब्रेक न घेता सतत एकाच जागेवर बसून राहणे यामुळे पाठदुखीचा त्रास वाढतो. यातच सतत एकाच जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे वाढलेले वजन, परिणामी, पाठीच्या मणक्यावर ताण येऊन पाठदुखीची समस्या वाढत जाते. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हा त्रास जाणवत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर, उठणे -बसणे कठीण होते. वैद्यकीय उपचार, व्यायाम, योगासने व योग्य आहाराच्या मदतीने आपण पाठदुखी नक्कीच टाळणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- संगणकावर काम करणाऱ्यांनी दक्षता घ्या

संगणकावर दीर्घकाळ काम म्हणजे पाठदुखी हे समीकरण झाले आहे. हे टाळण्यासाठी संगणकावर काम करताना आसन व्यवस्था कशी असावी, संगणक कसा हाताळावा याकडे लक्ष देण्याचा सल्ला ऑर्थाेपेडिक तज्ज्ञांनी दिला आहे.

- तासन तास एकाच स्थितीत बसून राहिल्याने आजार

शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे 'पाठीचा कणा.' मात्र, हाच आधार आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे कमकुवत होत चाललाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पाठदुखी ही गंभीर समस्या निर्माण होते आहे. या मागील कारण म्हणजे, एकाच स्थिती तासन् तास बसून राहिल्याने पाठीच्या स्नायूमधील ताकद कमी होते. यामुळे ‘स्पॉण्डिलायटिस’ हा आजार जो साठीनंतर दिसून येतो तो अलीकडे तीस-चाळीस वयोगटात दिसून येऊ लागला आहे. याला दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम आवश्यक आहे.

- डॉ. संजीव चौधरी, आर्थाेपेडिक सर्जन

- ही घ्या काळजी

:: संगणकावर काम करत असताना खुर्ची व टेबल यांची उंची व अंतर यांचे योग्य प्रमाण असावे.

:: खुर्चीवर बसल्यानंतर पाठीचा कणा सरळ रेषेत येईल असे बसावे.

:: की-बोर्डचा वापर करताना पुढे झुकू नये.

:: पाय समपातळीत जमिनीवर समोर ठेवावे.

:: मजकूर टाइप करत असताना हाताची बोटे कमीत कमी कोनातून वाकवावीत.

:: प्रत्येक तासानंतर उठून उभे राहावे. पाच मिनिटांचा ‘ब्रेक’ घ्यावा, ‘रिलॅक्स’ व्हावे.

- हे व्यायाम नियमित करा

बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सदोष पद्धती सोडून पाठ सरळ, ताठ ठेवणे हा या पाठदुखीवरील उपाय आहे. याशिवाय, नियमित सूर्यनमस्कार घालावेत, योगासने करावीत. विशेषकरून शलभासन, भुजंगासन, नौकासन, धनुरासन अशी पोटावर झोपून करण्याची आसने उपयोगी पडतात.

टॅग्स :Healthआरोग्य