पाटणसावंगी : आजारपणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे साेमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
करिश्मा किशाेर तुसावार (२३, रा. सद्भावना काॅलनी, पाटणसावंगी, ता. सावनेर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती काही दिवसांपासून सतत आजारी राहत असल्याने अस्वस्थ हाेती, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, ती साेमवारी सकाळी तिच्या खाेलीत गेली आणि आतून दार बंद करून घेत तिने छताच्या पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला. काही वेळाने ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास हेडकाॅन्स्टेबल जुनघरे करीत आहेत.