शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

नागपूर विद्यापीठात ‘यंग टीचर्स’ आघाडीवर ; शिक्षण मंचाची हवा गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला.

ठळक मुद्दे‘सेक्युलर’चा दम कायम‘नुटा’च्या पदरी निराशाच

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला. विधिसभा तसेच विद्वत् परिषदेत ‘यंग टीचर्स’चे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. तर त्याखालोखाल अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वातील ‘सेक्युलर पॅनल’नेदेखील चांगली कामगिरी केली. संपूर्ण ताकदीने निवडणुकांत उतरलेल्या शिक्षण मंचाला मात्र अपयशाचा सामना करावा लागला.नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक ९२.८२ टक्के मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले होते. विधिसभेच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी सोमवारी मतमोजणी सुरू झाली. सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत मतपत्रिकांची छाननीच चालली व त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला शिक्षक गट वगळता विधिसभेची मतगणना सुरू झाली. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच यंग टीचर्स असोसिएशनने आघाडी घेतल्याचे चित्र होते.विधिसभेत प्राचार्य गटात यंग टीचर्स असोसिएशनचे ५ उमेदवार निवडून आले. तर विद्यापीठ शिक्षक गट आणि व्यवस्थापन प्रतिनिधी गटात प्रत्येकी २ उमेदवार निवडून आले. तर ‘सेक्युलर पॅनल’ने ७ जागांवर यश मिळविले. शिक्षण मंचाच्या पदरात २ जागा पडल्या. शिक्षक गटातील मतगणना रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे तेथील जागांची आकडेवारी समोर येऊ शकली नाही.तायवाडे, दीक्षित पहिल्याच फेरीत विजयीविधिसभेतील प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी गटात बलाढ्य उमेदवार होते. प्राचार्य गटात नरेंद्रसिंह दीक्षित यांनी पहिल्याच फेरीत विजयी मतांचा ‘कोटा’ पूर्ण केला. तर विवेक नानोटी यांनी तिसऱ्या  व संजय धनवटे यांना पाचव्या फेरीत विजय मिळाला. व्यवस्थापन प्रतिनिधी गटात डॉ. बबन तायवाडे यांनी पहिल्याच फेरीत ५० मते घेत ‘कोटा’ पूर्ण केला. दुष्यंत चतुर्वेदी यांना दुसºया फेरीत तर आर. जी. भोयर यांना चौथ्या व अखेरच्या फेरीत विजय मिळाला.‘फार्मसी’वरून आक्षेपविज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील ‘फार्मास्युटिकल सायन्स’ अभ्यास मंडळाच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ झाला. नितीन उंदीरवाडे व धर्मेंद्र मुंधडा यांना सारखी मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. कुलसचिवांनी ही चिठ्ठी काढली. मात्र याला ‘सेक्युलर पॅनल’चे डॉ.डी.के.अग्रवाल यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार ही ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली नसल्याचा त्यांनी दावा केला. अखेर कुलगुरूंकडे हा आक्षेप नोंदविण्यात आला.‘इनकमिंग’ ठरले फ्लॉपसेक्युलर पॅनलला खिंडार पाडत शिक्षण मंचाने तेथील काही प्राध्यापकांना आपल्या गटात सामील करून घेण्यात यश मिळविले होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. विद्यापीठ शिक्षक गटातून विधिसभेत राजेंद्र काकडे दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सेक्युलर पॅनलचे उमेदवार ओमप्रकाश चिमणकर यांनी त्यांचा पराभव केला. काकडे हे या गटात अखेरच्या स्थानी राहिले.विजयी झालेले चर्चित चेहरेडॉ. बबन तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे, स्मिता वंजारी, मृत्यूंजय सिंह, दुष्यंत चतुर्वेदी, आर. जी. भोयर, डॉ. विवेक नानोटीयांचा झाला पराभवडॉ.राजेंद्र काकडे, पुरुषोत्तम थोटे, डॉ.स्नेहा देशपांडेनिकाल मान्य : कल्पना पांडेयंदाच्या निवडणूकांमध्ये गमविण्यासारखे आमच्याकडे काहीच नव्हते. आम्ही आपल्या परिने पुर्ण तयारी केली होती. मात्र मत मिळू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला निकाल मान्य आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे यांनी केले.विजयाची खात्री होतीच : डॉ.बबन तायवाडेविद्यापीठात आम्ही जी कामे केली आहेत त्याची पावतीच आज मतदारांनी दिली आहे. शिक्षकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. त्यामुळे विजयाची खात्री होतीच, असे मत यंग टीचर्स असोसिशनचे अध्यक्ष डॉ.बबन तायवाडे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक