शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

गाडगेबाबांचा वारसा चालवितो विदर्भाचा तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:41 IST

एक तरुण मल्टिनॅशनल कंपनीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी, हायक्लास जगणे सोडून थेट संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून मुंबईत कॅन्सर पीडितांसाठी उभारलेल्या धर्मशाळेत सेवा स्वीकारतो.

ठळक मुद्देमुंबईत धर्मशाळेतून प्रशांत देशमुख यांचा कॅन्सर पीडितांच्या सेवेचा वसा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात दु:ख प्रचंड आहे. ते ज्याच तोच गोंजारत असतो. इतरांना त्याकडे बघण्याचे भानही नाही. अशा जगातील एक तरुण मल्टिनॅशनल कंपनीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी, हायक्लास जगणे सोडून थेट संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून मुंबईत कॅन्सर पीडितांसाठी उभारलेल्या धर्मशाळेत सेवा स्वीकारतो. पहिल्याच दिवशी धर्मशाळेत रुग्णांचे हृदयविदारक दृष्य पाहताना अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन असलेल्या भेदरलेल्या पत्नीला तो सांगतो, ‘आपल्याकडे गाडगेबाबांच्या सेवेचा वारसा आलेला आहे, आता हेच आपले जग आहे...’१ जानेवारी २००६ चा तो दिवस आणि संपत चाललेले २०१८ हे साल. दीन, दु:खी रुग्णांच्या सेवेत अव्याहतपणे वाहिलेले प्रशांत देशमुख. गाडगेबाबांचे सहकारी अच्युतराव गुलाबराव देशमुखांचे नातू. कुणी राजेशाहीचा, कुणी उद्योगसमूहाचा तर कुणी राजकारणाचा वारसा चालवितो. त्यांच्याकडे मात्र चालून आला दु:खीजनांच्या सेवेचा वारसा.कुरबूर न करता त्यांनीही तो हसतमुखाने स्वीकारला आणि सक्षमपणे सांभाळलाही. देशभरातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी हजारो रुग्ण मुंबईत येतात. ना राहण्याची सोय, ना खाण्याचा पत्ता. तहानभूक आभाळाकडे सोपवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी धडपडतात. असे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मायेची ऊब देणाऱ्या आधारवड ठरल्या आहेत संत गाडगे महाराज ट्रस्टच्या धर्मशाळा.१९३६ साली गाडगेबाबा गावातील एका आजारी मुलाला घेऊन मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आले. राहण्याची कोणतीही सोय नव्हती. बाबांना त्या रुग्ण मुलासह दीड महिना फुटपाथवर घालवावा लागला. त्यावेळी बाबांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी.जी. खेर यांना जे.जे.च्या आवारात धर्मशाळेसाठी जागा देण्याची विनंती केली. परवानगी मिळाल्यानंतर दानदात्यांच्या मदतीने १२ खोल्यांची धर्मशाळेची इमारत बांधून काढली. त्यांच्या निधनानंतर सेवेची जबाबदारी घेतलेल्या अच्युतराव देशमुख, गुणवंतबाबा चराटे व यशवंत महाराज शिंदे यांच्या परिश्रमाने दानदात्यांच्या आर्थिक मदतीने दादरनंतर परळ व खारघर येथेही धर्मशाळा उभ्या झाल्या.प्रशांत २००५ पर्यंत नाशिक येथे विदेशी बँकेत मोठ्या पदावर कार्यरत होते. अशावेळी काका उत्तमराव अच्युतराव यांनी धर्मशाळेचा सेवारथ सांभाळण्याची सूचना केली. प्रशांत यांची व कुटुंबाचीही घालमेल सुरू होती. पण २००५ ला अंतिम निर्णय घेत त्यांनी नोकरी सोडून दिली आणि सेवक म्हणून धर्मशाळेत रुजू झाले व पुढे २००६ ला व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले.ते आले तेव्हा १०० खोल्यांची ही इमारत जीर्ण झाली होती. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी योग्य व्यवस्था नव्हती व त्यांच्या भोजनाचाही प्रश्न होता.पीडित मुलांसाठी मनोरंजनमुंबईत आल्यावर कॅन्सरपीडित मुलांच्या अनेक इच्छा असतात. कुणाला मुंबई फिरायची असते तर कुणाला अभिनेत्यांचे घर बघायचे असते. संस्थेतर्फे त्याची व्यवस्था केली आहे. शिवाय अनेक मनोरंजक कार्यक्रम व सणउत्सव साजरे केले जातात. विशेष म्हणजे प्रशांत यांची मुलेही या मुलांमध्ये सहभागी झाली आहेत.

असा झाला कायापालटया काळात प्रशांत यांनी शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांची भेट घेतली व अडचण सांगितली. धर्मशाळेत महिन्यातून एकदा अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. पुढे या दानदात्यांचा विश्वास वाढत गेला. अन्नदान आठवड्यातून आणि पुढे दररोज सुरू झाले. आश्चर्य म्हणजे दानदात्यांकडून अन्नादानाच्या तारखा २०२१ पर्यंत बूक आहेत. ज्यांना जी मदत जमली ती केली. प्रशांत यांच्या प्रयत्नांनी पाच माळ््याची ही धर्मशाळा आता सात माळ््याची व १०० खोल्यांवरून १५० खोल्यांची झाली आहे. १००-१५० रुग्ण थांबू शकतील असे दोन मोठे हॉल. पूर्वी ५०० ते ७०० ची व्यवस्था सांभाळणारी ही धर्मशाळा आता १२०० ते १५०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा राबता सांभाळण्यास सक्षम झाली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था आणि धर्मशाळेचे दरवाजे २४ तास खुले.

ध्येय सीमित नाहीधर्मशाळेत संपूर्ण देशातून रुग्ण येत असतात. त्यांच्या मदतीसाठी प्रशांत यांना देशातील प्रत्येक जिल्ह्यात संत गाडगे महाराज रुग्ण सहायता केंद्र सुरू करायचे आहे. शासनाने जागा दिल्यास मुंबई व नवी मुंबई येथे आणखी दोन धर्मशाळा उभारायच्या असून त्यासाठी दानदात्यांची तयारीही आहे. इतर ठिकाणी वृद्धाश्रमही सुरू करायचे आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक