माैदा : भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग क्र. ५३ वरील ढाबा परिसरात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
लुकेश राजेंद्र पटले (२२, रा. एरिगेशन काॅलनी, गुमथळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. लुकेश हा दुचाकीने जात असताना, महामार्गावरील ठाकरे बंधू ढाबा परिसरात सीजी-०४/एमएस-९६३६ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने वळण घेताना त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात लुकेश हा गंभीर जखमी हाेऊन बेशुद्ध पडला. लगेच त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लुकेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ), ३३७, २७९, सहकलम १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक माेहाेड करीत आहेत.