शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : जुन्या वैमनस्यातून प्रहार जनशक्तीचा शहरप्रमुख व त्याच्या भावाने तरुणासाेबत वाद उकरून काढला आणि त्याच्यावर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : जुन्या वैमनस्यातून प्रहार जनशक्तीचा शहरप्रमुख व त्याच्या भावाने तरुणासाेबत वाद उकरून काढला आणि त्याच्यावर लाेखंडी राॅडने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना अटक केली. ही घटना काटाेल शहरात मंगळवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

मंगेश बापूराव शिरपूरकर (रा. धंतोली, काटाेल) असे जखमीचे तर आशिष जयस्वाल व आनंद ऊर्फ अन्नू जयस्वाल (दाेघेही रा. काटाेल) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. आशिष जयस्वाल प्रहार जनशक्तीचे काटाेल शहर प्रमुख आहेत. मंगेश धंताेलीत कपडे प्रेस करण्याचे काम करताे तर जयस्वाल यांचे बिअरबार आहे. वाहने उभी करण्यावरून त्या दाेघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा. दाेन महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले हाेते. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी आशिष व आनंद यांनी मंगेशसाेबत वाद उकरून काढला व त्याला अश्लील शिवीगाळ करीत लाेखंडी राॅडने मारहाण केली. शिवाय, त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. मंगेशवर काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये भरती केले आहे.

या प्रकरणात पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने दाेघांनाही जामीन नाकारला असून, त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्यांची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार तथा तपास अधिकारी महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी रंजना नंदकिशाेर शिरपूरकर यांच्या तक्रारीवरून भादंवि ३२६, ३४ अन्वये गुनहा नाेंदविला आहे.