भिवापूर : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा जबर धक्का लागला. त्यातच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील उखळी येथे रविवारी (दि.२९) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश गिरीधर इरदंडे (३३, रा. उखळी, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. सुरेश हा रविवारी सकाळच्या सुमारास शेतात पिकाचे ओलित करण्यासाठी गेला हाेता. दरम्यान विद्युत डीपीला स्पर्श करताच त्याला विजेचा धक्का लागला. यात गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ अमाेल गिरधर इरदंडे यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बिट जमादार भगवानदास यादव करीत आहेत.