कळमेश्वर : मानसिक आजारी असलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव येथे मंगळवारी (दि. २१) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
प्रफुल्ल आत्माराम टाेपले (३०, रा. वाॅर्ड क्र. २, खडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रफुल्ल हा मानसिक आजारी असल्याने त्याच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. २९ ऑगस्ट राेजी हाॅस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर ताे घरीच हाेता. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरातील स्लॅबच्या लाेखंडी हुकला दुपट्ट्याने गळफास लावून ताे मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी राहुल आत्माराम टाेपले (३३, रा. वाॅर्ड क्र. २, खडगाव) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहाय्यक फाैजदार दिलीप सपाटे करीत आहेत.