शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : सर्वजनिक ठिकाणी दारू पित बसलेल्यांना हटकले असताच सात जणांनी तरुणास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : सर्वजनिक ठिकाणी दारू पित बसलेल्यांना हटकले असताच सात जणांनी तरुणास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत त्या तरुणाची साेनसाखळी गहाळ झाली. ही घटना वाडी शहरात रविवारी (दि. २४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

करण रामदुलारे पाल (३२, रा. स्नेहनगर, नागपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. करणचे ज्ञानेश्वर लेआउट, दत्तवाडी येथे इलेक्ट्राॅनिक दुकान आहे. या दुकानाच्या बाजूला बांधकाम सुरू असून, तिथे चार तरुण कारने तर तिघे माेटारसायकलने तिथे आले. हे सातही जण २० ते २५ वर्षे वयाेगटांतील असून, त्यांनी तिथे दारू प्यायला सुरुवात केली. त्यामुळे करणने त्यांना हटकले. त्यामुळे त्या सर्वांनी शिवीगाळ करीत करणला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात एकाने त्याच्या खंद्यावर लाेखंडी हाताेड्याने वार केल्याने ताे गंभीर जखमी झाला.

बांधकामावरील प्रतीक देठे नामक कामगार करणच्या मदतीला धावल्याने ताे बचावला. या मारहाणीत करणची दाेन ताेळे वजनाची साेन्याची चेन गहाळ झाल्याचे तसेच आराेपींची नावे चारू, बिंगाे अशी असल्याचे त्याने पाेलीस तक्रारीत नमूद केले आहे. त्याच्यावर नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास वाडी पाेलीस करीत आहेत. वृत्त लिहिस्ताेवर आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.