शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मते द्या, मी प्रायोजक देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:26 IST

साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे.

ठळक मुद्दे‘तो’ उमेदवार कोण? : आयोजकांना ‘आॅफर’ दिल्याची साहित्यसृष्टीत जोरदार चर्चा

शफी पठाण।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे. त्यातूनच एका उमेदवाराने बडोद्यातील संमेलनाच्या आयोजकांना तुम्ही मला एकगठ्ठा मते द्या, मी तुम्हाला प्रायोजक मिळवून देतो, अशी ‘फायद्याची आॅफर’दिल्याची साहित्यसृष्टीत जोरदार चर्चा आहे. ‘तो’ उमेदवार कोण याची आता चिकित्सा सुरू असून शारदेच्या उत्सवासाठी असे लक्ष्मीचे आमिष दाखवले जात असल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. यंदाचे संमेलन गुजरात राज्यातील बडोद्यात होत आहे. महाराष्ट्र शासनाने या संमेलनसाठी २५ लाखांचा निधी आधीच दिला आहे.परंतु संमेलनाचा खर्च एकूणच कोटीच्या घरात असल्याने व सध्या गुजरातमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने तेथील स्थानिक राजकीय प्रायोजक मिळवताना आयोजकांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत.गुजरात सरकारकडून या संमेलनासाठी निधी मिळावा, याकरिताही आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आयोजकांची निधीसाठी होणारी ही दमछाक नेमकी हेरून एका उमेदवाराने आयोजकांच्या ताब्यातील एकगठ्ठा मते मिळावी यासाठी त्यांना प्रायोजकत्व मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याची जोरदार चर्चा आहे.

घटक संस्थाप्रमुखांना राजकीय नेत्यांचे फोन?आपल्या पसंतीचा उमेदवार संमेलनाध्यक्षपदी निवडून यावा, यासाठी आता काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही थेट आखाड्यात उतरून घटक संस्थाप्रमुखांना फोनाफोनी सुरू केल्याचे वृत्त आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी २७ आॅक्टोबर रोजी मतदारांना पोस्टाने मतपत्रिका पाठवल्या आहेत. येत्या ९ डिसेंबरपर्यंत या मतपत्रिका महामंडळाकडे परत पाठवायच्या आहेत. त्याआधी या मतपत्रिकांवर आपले नाव कोरले जावे, यासाठी काही उमेदवार आपले राजकीय वजन वापरत मतदारांवर दबाव निर्माण करत असल्याची चर्चा आहे. याहून गंभीर बाब म्हणजे यातल्याच एका उमेदवाराने तर थेट धर्माचे साकडे घालून मतांचा जोगवा मागितल्याचे किस्सेही साहित्य वर्तुळात चर्चिले जात आहेत.अशी कुठलीही ‘आॅफर’ नाहीआम्हाला कोणत्याही उमेदवाराने प्रायोजकत्व मिळवून देण्यासाठी कुठलीही आॅफर दिलेली नाही. आम्ही संमेलनाच्या तयारीत व्यस्त असून हे संमेलन अधिक चांगले कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत.दिलीप खोपकर, अध्यक्ष, मराठी वाङ्मय परिषद, बडोदा