शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही एक पाऊल पुढं या, आम्ही एक पाऊल मागे येतो; संदीप जोशी यांचे तुकाराम मुंढे यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:30 IST

मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.

ठळक मुद्देजनतेच्या व शहराच्या विकासासाठी दोघे मिळून काम केले तर अधिक योग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादामध्ये मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.

सोमवारी संध्याकाळी महापौरांनी आयुक्तांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि. (एनएसएसडीसीएल)च्या संचालक मंडळाची मंजुरी नसताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, एनएसएसडीसीएलच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर आणि लेखा अधिकारी अमृता देशकर यांनी संगनमताने ५० कोटीच्या निविदा जारी केल्या. तसेच कंत्राटदारांना १८ कोटीची रक्कम अदा केली. हा कंपनी कायद्याच्या कलम ४४७ नुसार गुन्हा असल्याने यासंदर्भात मुंढे यांच्यासह तिघांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापौरांनी स्वत: पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून तकार दाखल केल्याने महापालिका प्रशासनासह शहरातही खळबळ उडाली आहे.

तर माझी नियुक्ती नियमानुसार असून कोणतेही नवीन कंत्राट दिले नाही. जुने बिल दिले. सर्व व्यवहार कायदेशीर व पारदर्शी असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. मुंढे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४०९ ,४२०, ४६३, ४६४,४६५,४६८ व अन्वये व कंपनी कायदा कलम ४४७ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी या तकारीत केली आहे. सदर तक्रार पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविली आहे, त्यावर काय कारवाई करायची, या संबंधात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.

सभेअगोदर बोलताना जोशी पुढे म्हणाले, राग सोडा आणि सभेला या. शहराचा विकास हा महत्त्वाचा आहे. आपण दोघे मिळून काम करू ते अधिक योग्य राहील. आमच्याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलिसांकडे द्याव्यात. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र जनतेचे काम आधी करणे हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशी