शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

येस बँक-अवंता घोटाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

राणा कपूर यांना लाच देणाऱ्या गौतम थापर यांच्याशी संबंधाचा संशय लोकमत न्यूज नेटवक नागपूर : गेल्या बुधवारी दिल्लीत ईडीने ...

राणा कपूर यांना लाच देणाऱ्या गौतम थापर यांच्याशी संबंधाचा संशय

लोकमत न्यूज नेटवक

नागपूर : गेल्या बुधवारी दिल्लीत ईडीने अटक केलेले अवंता समूहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर यांच्याशी संबंधित येस बँक घोटाळा प्रकरणात मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने नागपूरमधील सीए अश्विन माणकेश्वर यांचे घर व कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या कारागृहात असलेले येस बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ३०७ कोटींची लाच दिल्याचा व त्याबदल्यात एकोणीसशे कोटी रुपये कर्ज उचलल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. अवंता समूह व सीजी पॉवर अ‍ॅण्ड ट्रेड सोल्युशनने विविध सरकारी व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन किमान अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली व या रकमा अन्यत्र वळविण्यात आल्या, असा तपास यंत्रणांना संशय आहे.

गौतम थापर यांच्या प्रकरणाचा तपास ईडी तर राणा कपूर यांच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. कपूर यांनी दिल्लीत बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत बंगला व इतर माध्यमातून थापर यांच्याकडून लाच घेतली व त्यांची कर्जे मंजूर केली. गेल्या मंगळवारी रात्री प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) कायद्याखाली ईडीने गौतम थापर यांना ताब्यात घेतले. ते सध्या दहा दिवसांच्या ईडी कोठडीत आहेत. या प्रकरणात एक्टान ग्लोबल प्रा. लि. या कंपनीचा सहभाग आढळून आला असून, सीए अश्विन माणकेश्वर हे त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे धरमपेठ येथील कार्यालय तसेच रामदास पेठेतील निवासस्थानी मंगळवारी ईडीने छापे टाकले.

--------------

चौकट

राणा कपूरच्या चौकशीची

सीबीआयला पुन्हा परवानगी

मुंबई - येस बँक घोटाळ्यातील अवंता समूहाच्या भूमिकेचा अधिक सखोल तपास करण्यासाठी सध्या कारागृहात असलेले राणा कपूर यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अर्ज येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. त्यामुळे येस बँकेच्या घोटाळ्यातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. अवंता समूहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर यांना अटक केल्यानंतर राणा कपूर यांची पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने त्यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करणारा अर्ज शुक्रवारी सीबीआयने विशेष न्यायालयासमोर केला होता.