शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानात यंदा ७८४ गावांची निवड

By admin | Updated: May 30, 2017 01:41 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून झालेल्या कामांमुळे भूगर्भातील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली असताना यावर्षी ७८४ गावांची निवड करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त अनुप कुमार : २३ हजार ७५० कामांना सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून झालेल्या कामांमुळे भूगर्भातील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली असताना यावर्षी ७८४ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त अभियानामुळे शिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासोबतच पिकांना संरक्षित सिंचन मिळावे हा उद्देश ठेवून यावर्षी २३ हजार ७५० कामे घेण्यात येणार असून, कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.विभागात मागील वर्षी नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांनी जलयुक्त मोहीमेंतर्गत राज्यात उल्लेखनीय काम केले असल्यामुळे यावर्षी पाण्यासाठी गाव स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने माथा ते पायथा या पद्धतीने तसेच जलसंधारणाच्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून ७८४ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानासाठी ६७० कोटी ४० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ चा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या विविध कार्यक्रमासोबतच नदी खोलीकरणाची कामेसुद्धा याअंतर्गत घेण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यात २२० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३,४१९ कामांसाठी १५० कोटी ८४ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात १३८ कामांसह यशोदा नदी खोलीकरणासाठी सहा कामे घेण्यात आली असून, २,८७० कामांसाठी १४७ कोटी ८९ लक्ष रुपये खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६२ कामांसह २८ जनवन गावांमध्ये ९,७९५ कामे घेण्यात येणार असून, यावर १३५ कोटी ९१ लक्ष रुपये खर्च होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात १११ गावांमध्ये ३,७९१ कामांवर ८७ कोटी ७२ लक्ष रुपये, भंडारा जिल्ह्यात ५६ गावांमध्ये १६८९ कामांसाठी ६० कोटी ५८ लक्ष रुपये तर गोंदिया जिल्ह्यात ६३ गावांमध्ये २,१८६ कामांवर ८७ कोटी ४६ लक्ष रुपये खर्च येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.