शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दिवाळी छोट्या कारागिरांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:54 IST

भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्तकेले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत.

ठळक मुद्दे भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करा : कॅटचे ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्तकेले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाला स्थानिक स्तरावर प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय कॅटने घेतला आहे. १० जूनला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यावर्षी राखी आणि गणेश चतुर्थी सणात लोकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करीत भारतीय वस्तूंची खरेदी केली. दिवाळी सणातही भारतीय सजावटीच्या वस्तूंची ग्राहकांना विक्री करण्यास व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. गेल्यावर्षी चीनने भारतीय सणांमध्ये बाजारावर ताबा मिळविण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. पण आता भारतीय व्यापाऱ्यांनी सणांमध्ये बाजारपेठा चिनी वस्तूमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यातच ‘भारतीय वस्तू, माझा अभिमान’ या कॅटच्या अभियानाचा व्यापारी हिस्सा बनले आहेत. चीन दरवर्षी सणांमध्ये भारतात जवळपास ४० हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात करते. पण कॅटच्या अभियानाने चीनला या वस्तूंच्या निर्यातीवर पाणी सोडावे लागले आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, या अभियानांतर्गत यावर्षीच्या सणांच्या दिवसात कॅटने दिल्लीसह संपूर्ण देशात ३५० क्लस्टर नव्याने उदयास आणले आहेत. दिवाळी सणांमध्ये पूजा आणि दुकान व घरांच्या सजावटीच्या वस्तू याच क्लस्टरमधून मिळणार आहेत. या वस्तूंमध्ये भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती दिसेल. यामध्ये मातीपासून तयार केलेले कलात्मक व पेंट केलेले दिवे, दारावर लावण्यात येणारी माळ, झुंबर, लक्ष्मीचे पाय, शुभ-लाभाचे चिन्ह, सजावटी झालर, हँगिंग, खादीपासून तयार सजावटी वस्तू, मोती, बीडपासून तयार वस्तू, मधुबनी व मैथिली पेंटिंगसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. पूर्वीही अशा वस्तू देशात तयार व्हायच्या, पण त्यांना बाजारपेठ मिळत नव्हती. आता कॅटने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या वस्तू व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्यापारी आणि लोकांनी न्याव्यात, असे आवाहन कॅटने केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीbusinessव्यवसाय