शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी

By admin | Updated: May 3, 2016 03:38 IST

प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत

नागपूर : प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत प्रशासकीय बदल्यांना स्थगिती देऊन यावर होणारा खर्च राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात यावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या एका तरुणाने नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविले. श्रीधर आडे (३०) असे या आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव आहे. तो यवतमाळचा रहिवासी आहे. तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आझाद हिंद नावाचे एक क्रीडा मंडळ तो चालवितो. या माध्यमातून तो कबड्डी व अ‍ॅथ्लेटिक्सचे प्रशिक्षण देतो, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही देतो. राज्यात सध्या दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. पाण्यासाठी लोकांचा बळी जात आहे. या परिस्थितीने श्रीधर आडेला व्यथित केले. यावर राज्यातील प्रशासकीय बदल्यांवर अब्जो रुपये खर्च होतात. तेव्हा चालू वर्षात अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि विशेष कारणांमुळे होणाऱ्या बदल्या वगळता इतर सर्व प्रकारच्या गटातील होऊ घातलेल्या बदल्यांना तत्काळ स्थगिती दिली तर बदली प्रक्रियेवर होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी वापरता येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्या तातडीने स्थगित करून त्यावर होणारा खर्च दुष्काळ निवारण्यासाठी कामी आणावा, अशी मागणी करणारे निवेदन श्रीधरने २३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. तसेच १ मेपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास नागपुरात वीरूगिरी आंदोलन करण्याचा इशाराही त्याने दिला होता. शासनाने त्याच्या या निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. १ मेपर्यंत त्याला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्रीधर सोमवारी सकाळीच नागपुरात आला. त्याने वीरूगिरी आंदोलन करण्याचे अगोदरच पक्के केले होते.