शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना

By admin | Updated: September 20, 2015 03:11 IST

यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे बुद्धाला समजून घ्यायचे असेल तर अगोदर यशोधरेला समजून घेणे आवश्यक आहे,

नागपूर : यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे बुद्धाला समजून घ्यायचे असेल तर अगोदर यशोधरेला समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे शंकरनगर चौक येथील प्रतिष्ठानच्या सभागृहात डॉ. प्रकाश खरात यांच्या ‘यशोधरा’ या कादंबरीचा प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. मनोहर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे मुख्य वक्ते होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रमेश बोरकुटे व्यासपीठावर होते. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उचलला अशा बहुजन समाजातील नायकांना खलनायक ठरवून त्यांचा आवाज दडपण्याचे काम करण्यात आले. तेव्हा इतिहासातील ज्या-ज्या व्यक्तींवर व्यवस्थेने अन्याय केला, त्यांचा आवाज दडपला अशा लोकांचा आवाज बनून त्यांचे नायकत्व प्रस्थापित करण्याचे काम आंबेडकरी लेखकांनी केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. रुपा कुळकर्णी म्हणाल्या, यशोधरा ही कादंबरी लिहून प्रकाश खरात यांनी केवळ बौद्ध साहित्यालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यमध्ये भर घातली आहे, मराठी साहित्याला मोठी भेट दिली आहे. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी यशोधरा कादंबरी ही बुद्ध काळातील सर्वांगीण परिस्थितीचा कोलाज असल्याचे मत व्यक्त केले. लेखक डॉ. प्रकाश खरात यांनी आपल्या मनोगतात या कादंबरीसाठी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करण्यासोबतच बौद्ध स्थळांना भेटी दिल्याचे सांगितले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी संचालन केले. याप्रसंगी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, ई. झेड. खोब्रागडे, कृष्णा इंगळे, इ.मो. नारनवरे, भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, लोकनाथ यशवंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)