शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यश बोरकर खून प्रकरण : आरोपीच्या फाशीवर निर्णय राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:37 IST

यश बोरकर खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय पुन्हा राखून ठेवला.

ठळक मुद्देहायकोर्टाने दूर केली जप्त मोबाईलविषयीची अस्पष्टता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यश बोरकर खून प्रकरणात जप्त करण्यात आलेला मोबाईल व सीमकार्डसंदर्भात आढळून आलेली अस्पष्टता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सुनावणी घेतली. दरम्यान, न्यायालयाने आरोपीचे वकील अ‍ॅड. संतोष चांडे व सरकारी वकील अ‍ॅड. संजय डोईफोडे यांना आवश्यक प्रश्न विचारून, प्रकरणावरील निर्णय पुन्हा राखून ठेवला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संतोष अरविंद काळवे (२६) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना पोलीस असल्याचे सांगितले होते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व ११ वर्षीय बालक यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकिर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले आहे. तसेच, आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे.