शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापनगरातील कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 01:17 IST

जयताळा (प्रतापनगर) येथील एका कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी धाड घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेतले.

दोन महिलांसह तिघांना अटक : पीडित तरुणींची सुटका नागपूर : जयताळा (प्रतापनगर) येथील एका कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी धाड घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्यासह अनेक गरजू महिला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुष दलालाला पोलिसांनी अटक केली.आकाश अशोक जगणे (वय २५, रा. कुंभार ले-आऊट कामठी), रजनी विष्णू नेहारे (वय ४८, रा. सारंग अपार्टमेंट, जयताळा) आणि रंजना भीमराव लांजेवार (वय ५०, रा. कन्हान) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत. हे तीनही आरोपी एकमेकांच्या नात्यात लागतात. दोन महिन्यांपासून त्यांनी नेहारेच्या सदनिकेत कुंटणखाना सुरू केला होता. रोज मोठ्या प्रमाणात तेथे ग्राहक यायचे, नवनवीन ग्राहकांची वर्दळ बघून आजूबाजूच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली होती. ही माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार शिवाजी गायकवाड यांनी शहानिशा करून घेतली. माहिती पक्की असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार, गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास पोलिसांनी जगणे आणि नेहारेकडे देहविक्रय करणाऱ्या मुलींची मागणी करणारे ग्राहक पाठविले. त्यांनी ग्राहकांकडून प्रत्येकी दीड हजार रुपये घेऊन देहविक्रय करणाऱ्या दोन तरुणी तसेच रूम उपलब्ध करून दिल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार, ठाणेदार गायकवाड यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. मुंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जी. बनसोड हवालदार अविनाश शेरसिंग, महिला शिपाई किरण आणि दीपाली यांनी नेहारेच्या सदनिकेत धाड घातली. यावेळी तेथे दोन तरुणी वेश्याव्यवसाय करताना सापडल्या. त्यांना तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या जगणे, नेहारे आणि लांजेवार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)तरुणींची सुधारगृहात रवानगीपैशाचे आमिष दाखवून जगणे, नेहारे आणि लांजेवार हे तिघे ‘त्या’ दोघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर त्यांच्यावर पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करून त्यांची २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. तर, पीडित तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पीडित तरुणी आणि कुंटणखाना चालविणाऱ्या महिला नातेवाईक आहेत. पैशासाठी यातील एका महिलेने पवित्र नातेसंबंध बदनाम केले आहे.